शिक्षक मतदार संघ निवडणूक : अधिकारी, कर्मचारी साहित्यासह मतदान केंद्राकडे रवाना

जून 25, 2024 5:57 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जून २०२४ । नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी 26 जून रोजी मतदान होत असून याकरीता जळगांव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात 1, यावल तालुक्यात 1, रावेर तालुक्यात 1, मुक्ताईनगर तालुक्यात 1, बोदवड तालुक्यात 1, भुसावळ तालुक्यात 2, जळगांव तालुक्यात 3, धरणगांव तालुक्यात 1, अमळनेर तालुक्यात 2, पारोळा तालुक्यात 1, एरंडोल तालुक्यात 1, भडगांव तालुक्यात 1, चाळीसगांव तालुक्यात 2, पाचोरा तालुक्यात 1, जामनेर तालुक्यात 1 असे एकूण 20 मतदान केद्र आहे.

news1 1 jpg webp

जिल्ह्यात 13 हजार 122 शिक्षक मतदार असून त्यात 9 हजार 673 पुरुष तर 3 हजार 449 स्त्री मतदार आहे. मतदानासाठी 120 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून प्रत्येक केंद्रासाठी केंद्राध्यक्ष, कर्मचारी, सुक्ष्म निरीक्षक, एक शिपाई, तसेच बंदोबस्तासाठी पोलीस कर्मचारी, भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदानासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण झाले असून आज कर्मचारी मतदान साहित्यासह मतदान केंद्रावर पोहोचले आहे.

या निवडणूकीत जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिक्षक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क निर्भयपणे बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्री.आयुष प्रसाद यांनी केले आहे यांनी केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now