⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | रावेरमधून ९ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात ; यांच्यात होणार चौरंगी लढत

रावेरमधून ९ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात ; यांच्यात होणार चौरंगी लढत

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ नोव्हेंबर २०२४ । विधानसभा निवडणूकीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या माघारीचा आज शेवटचा दिवस होता. आज माघारीच्या दिवशी रावेर विधानसभा मतदार संघात १४ जणांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे आता निवडणूकीच्या रिंगणात ९ उमेदवार आहेत. तरी खरी लढत ही भाजपा, काँग्रेस, प्रहार जशक्ती आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात होणार असून चौरंगी लढत राहणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

निवडणूकीसाठी हे उमेदवार रिंगणा :
रावेर विधानसभा निवडणूकीत शेवटच्या दिवशी चौदा उमेदवारांनी माघार घेतली असुन ९ उमेदवार रिंगणात आहे. यात अमोल हरीभाऊ जावळे (भाजपा), धनंजय शिरीष चौधरी (काँग्रेस), नारायण हिरामण अडकमोल (बसपा), अनील छबिलदास चौधरी (प्रहार जनशक्ति पार्टी), आरिफ खालिक शेख ( ऑल इंडिया मजलिस पार्टी), खल्लोबाई युनूस तडवी (ऑल इंडिया हिंदुस्तान काँग्रेस पार्टी) मुस्ताक कमाल मुल्ला (आजाद समाज पार्टी), शमिभा भानुदास पाटील (वंचित बहुजन आघाडी), दारा मोहंमद जफर मोहंमद (अपक्ष) असे ९ उमेदवार रिंगणात आहे.

यांनी घेतली माघार :
शेवटच्या दिवशी माघार घेणाऱ्यांमध्ये सुरेश गुलाब बोदडे, उमा विठ्ठल भिल, संजय अर्जुन चौधरी, नुरा तडवी, धीरज अनिल चौधरी, नंदिनी अनिल चौधरी, अबाज फकिरा तडवी, वामनराव भालचंद्र जडे, गंगाराम महेंद्र बान्हे, दिवाकर वाणी, शोहिखान मुस्तफा तडवी, शेख कुर्बान शेख करीम, संजय हमीद तडवी, हर्षा अनिल चौधरी यांनी शेवटच्या दिवशी माघार घेतली आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.