जळगाव जिल्ह्यात 82 खाजगी रुग्णालयांना मिळाले 517 रेमडेसिवीर इंजेक्शन्स

मे 11, 2021 4:22 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मे २०२१ । कोरोना बाधित रूग्णांवर उपचारासाठी आज जिल्ह्यातील 82 खाजगी हॉस्पिटल्सना 517 रेमडेसिवीर इंजेक्शन्सच्या व्हायल्सचे वितरण करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.

abhijit raut

आज (11 मे) रोजी जिल्ह्याला 517 रेमडेसिवीर इंजेक्शनच्या व्हायल्स प्राप्त झाल्या असून त्यानुसार जिल्ह्यातील कोविड उपचार करणा-या 82 खाजगी रुग्णालयांना ऑक्सीजन, आयसीयु, व्हेंटीलेटर बेडच्या संख्येनुसार रेमडेसिवीर इंजेक्शन्सच्या व्हायल्स या महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा व ग्रामीण क्षेत्रातील हॉस्पिटल्सला वितरीत करण्यात आल्या आहेत.

जळगाव जिल्ह्यातील रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा विचारात घेता सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध कार्यालय येथे २४ X ७ रेमडेसिवीर नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. रेमडेसिवीरचा काळाबाजार रोखण्याच्या अनुषंगाने शहरी व ग्रामीण भागात भरारी पथके प्रांताधिकारी व तहसिलदार यांचे नियंत्रणाखाली स्थापन करण्यात आली असून त्यांचेमार्फत रुग्णालये, स्टॉकिस्ट व वितरक यांचेकडील रेमडेसिवीरची उपलब्धता व सुयोग्य वापर यावर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. त्यासोबतच महानगरपालिका, नगरपालिका प्रशासन व नगर पंचायतसह आयुक्त, औषध प्रशासन यांनी प्राधिकृत केलेल्या आरोग्य अधिकारी यांनी नियंत्रण करणेबाबतही सुचना देण्यात आल्या आहेत.

रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार होऊ नये याकरीता दररोज प्राप्त झालेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचे रूग्णालयनिहाय वाटप करण्यात येवून केलेल्या वाटपाची हॉस्पिटलनिहाय रेमडेसिवीर इंजेक्शन्सच्या संख्येसह व वितरकाच्या नाव व मोबाईल क्रमांकासह यादी तयार करण्यात येत असल्याचेही जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी सांगितले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now