⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा ७६७ रुग्णांनी घेतला लाभ

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२२ । राष्ट्रीय आरोग्य अभियान व सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत पारोळा येथील कुटीर रुग्णालयात मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आला. या शिबिरात ७६७ रुग्णांची आराेग्य तपासणी करण्यात आली.

या वेळी नगराध्यक्ष करण पवार, नगरसेवक रोहन मोरे, गटविकास अधिकारी विजय लोंढे, पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. संभाजी पाटील, बालरोग तज्ज्ञ डॉ. सुमित हलगे, नेत्र रोग तज्ज्ञ डॉ. राजकुमारी जैन, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. चेतन नाईक, नाक, कान, घसा तज्ज्ञ डॉ. कुलदीप पवार, दंत चिकित्सक डॉ. प्रशांत सोनवणे, आयुष वैद्यकीय अधिकारी डॉ. बेग, डॉ. राजेश वॉल्डे, सिकल सेल टेक्निशियन अश्विनी जोशी, नेत्र रोग टेक्निशियन सोमलाल पवार, एचआयव्ही टेक्निशियन नामदेव अहिरे, बबन महाजन, अधीपरीचारिका सोनाली गुरव, कल्पना चौधरी, राखी बडगुजर, मनीषा महाले, करून पवार, दीपक सोनार, राजू वानखेडे, विशाल गोयर अादी उपस्थित हाेते. डॉ. योगेश साळुंखे आणि डॉ. चंद्रकांत सूर्यवंशी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी डॉ. सूर्यवंशी, डॉ. राजकुमारी जैन यांनी आरोग्य विषयक टिप्स दिल्यात. तर करण पवार यांनी या योजना सामान्य माणसाला दिलासा देणाऱ्या ठरतील, असा आशावाद व्यक्त केला. डॉ. योगेश साळुंखे यांनी आभार मानले.

या वेळी ७६७ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यात जनरल ओपीडी २०१ रुग्ण, गरोदर माता आणि स्त्रीरोग १४० रुग्ण, बालरोग ४०, नेत्ररोग ११०, नाक- कान- घसा ३०, अस्थिरोग ६५, दातांचे ३५ रुग्ण, आयुष आणि होमिओपॅथी १२५, २१ मानसिक रुग्णांची तपासणी करण्यात आली. तसेच २५ सिकल सेल रुग्णांची तपासणी, २४ कुष्ठ रोग, १९५ एचआयव्ही, ७० ब्लड शुगर रुग्णांची तपासणी केली. तर ३० जणांचा एक्सरे, १५ जणांची इसीजी करण्यात अाली. तर ९ जणांनी रक्तदान केले.