जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । तिर्थक्षेत्र मुक्ताईनगर आणि जुनी कोथळी येथे बुधवारी आदिशक्ती संत मुक्ताईंचा ७२५वा अंतर्धान समाधी सोहळा पार पडला. या सोहळ्यात दिवसभरात सुमारे एक लाख वारकरी, भाविकांनी मुक्ताईच्या चरणी डोके ठेवले. या सोहळ्याची खरी रंगत वाढवली ती सकाळी ९ वाजेपासून सुरू झालेल्या संत नामदेव महाराज यांचे १६ वे वंशज केशवदास नामदास महाराज यांच्या गुलालाचे कीर्तनाने. यानंतर संत मुक्ताईच्या प्रतिमेवर पुष्पवर्षाव व महाआरती करून तिरोभूत अंतर्धान सोहळा साजरा झाला.
२५ मे रोजी वैशाख वद्य दशमी तिथीनुसार जुनी कोथळी मुक्ताई मंदिरात पांडुरंग परमात्मा पादुका पालखी (पंढरपूर), निवृत्तीनाथांची पादुका पालखी (त्र्यंबकेश्वर), माता रुख्मिणी पादुका पालखी (कौंडिण्यपूर), संत नामदेव महाराज पादुका पालखी (पंढरपूर), व्यास महाराज पादुका पालखी (अंजाळे), रेडेश्वर महाराज पादुका पालखी (आळेफाटा) आणि विदर्भासह पंचक्रोशीतील हजारो भाविक, वारकरी परमेश्वराची आळवणी करत मुक्ताईनगरात दाखल झाले. सोहळ्यात गुलालाचे कीर्तनात केशवदास नामदास महाराजांनी मुक्ताई चरित्र डोळ्यासमोर उभे केले. त्या काळातील प्रसंग, संत चौघ भावंडांचे झालेले हाल मांडताना वारकऱ्यांचे डोळे पाझरले.
यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कॅमिटी आळंदी येथील प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, पंढरपुर पालखी सोहळ्याचे प्रमुख सुर्यकांत भिसे, निवृत्ती महाराज संस्थान त्र्यंबकेश्वर अध्यक्ष जयंत महाराज गोसावी, रुक्मिणी माता संस्थानचे अमळकर महाराज , संत नामदेव महाराज यांचे सोळावे वंशज केशवदास महाराज यांच्यासह खासदार रक्षा खडसे, ऍड. रोहीणी खेवलकर, नगरसेवक संतोष मराठे, प्रभारी नगराध्यक्षा मनीषा पिटील, धनराज महाराज, विश्वंभर महाराज तिजोरे, उद्भोज महाराज पैठणकर, नंदकिशोर महाराज पंढरपुर, माऊली प्रतिष्ठान मुंबई चे सबनीस बंडातात्या कराडकर यांच्यासह इतर प्रमुख उपस्थित होते. व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार संत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष ऍड. रविंद्र भैय्या पाटील,विश्वस्त पंजाबराव पाटील, संदिप पाटील इदींनी केला. कार्यक्रमाचे सुत्र संचालन ह भ प रविंद्र हरणे महाराज यांनी तर आभार विशाल महाराज खोले यांनी मानले. सत्कार समारंभ आटोपल्यावर लागलीच गुलालाचे किर्तन व पुष्पवृष्टी करुन आदीशक्ती मुक्ताईचा सप्त शतकोत्तर रौप्यमहोत्सही अंतर्धान सोहळा साजरा करण्यात आला.
५ लाख ५५ हजाराचा धनादेश
मूक्ताई संस्थांनतर्फे अंतर्धान समाधी सप्त शतकोत्तर रोप्य महोत्सवी निमित्ताने संपुर्ण वर्षभर अखंड कथा किर्तन व पारायण नखम संकिर्तन ऐतिहासिक सप्ताह पर्वकाळ आयोजित केल्याबद्दल आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी मुक्ताई संस्थानचे अॅड रविंद्र भैय्या पाटील यांचा सत्कार केला.व आदिशक्ती मुक्ताईला भाऊ संत ज्ञानेश्वर माऊली संस्थान यांचे तर्फे भेट ५ लाख ५१ हजार रु रकमेचा धनादेश देऊन ओटी भरली.तसेच संत निवृत्तीदादा संस्थान त्र्यंबकेश्वरला ५ लाख ५५ हजाराचा धनादेश भेट दिला.