..अखेर ६ व्या दिवशी पाचोरा जागृत जनमंचचे उपोषण मागे

फेब्रुवारी 17, 2022 10:58 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० डिसेंबर २०२२ । भडगाव ते पाचोरा दरम्यान तितूर नदीजवळ भडगाव कडून येणारा रस्ता अचानक थांबला. आणि पुढे नदीची २०फूट खोल खाई अशी घातक अवस्था आणि भडगाव कडून वाहन आले कि सरळ खाईत जाऊन पडत असे काही चित्र तर उजवीकडे वळून विरूद्ध दिशेने येणाऱ्या वाहनाला ठोकत असे एकूण ४० अपघात झाले. या अपघाती जागेने १२ लोक अपघाती मृत्यूमुखी पडले.

पाचोरा जागृत जनमंच

त्यातच १९जानेवारीला नाचणखेडा येथील १९वर्षाचा तरुण मुलगा या कारणे अपघाताने वारला. ही मृत्यू साखळीला कारणीभूत असलेली रस्त्याचे वास्तव अधिकाऱ्यांच्या लक्षात यावे या प्रामाणिक हेतूने उपोषणास बसलेल्या आणि या अर्धवट सोडलेल्या रस्त्याचा प्रश्न चव्हाट्यावर आणून प्रशासनाला जाग आणणारे जळगाव जिल्हा जागृत जनमंच चे अध्यक्ष शिवराम पाटील व पाचोरा जागृत जनमंच चे अध्यक्ष निलकंठ पाटील यांचे उपोषण खासदार उन्मेश पाटील यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना धारेवर धरत त्यांना तंबी देत सोडले.

याबाबत वस्तुस्थिती काही महिन्यापूर्वी व्हीडीओ चित्रण घेऊन जळगाव जिल्हा जागृत जनमंच चे अध्यक्ष शिवराम पाटील व पाचोरा जागृत जनमंच चे अध्यक्ष निलकंठ पाटील यांनी ही समस्या प्रसारीत केली होती. अखेर २४ तारखेपासून अपघात स्थळी निलकंठ पाटील व गुलाब पाटील यांनी उपोषण सुरू केले. धुळे व जळगाव चे संबंधित अभियंत्यांनी उडवाउडवीची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला.पण प्रत्यक्ष जागेवर काम अर्धवट सोडल्याचे लक्षात आल्याने संघटना अडून बसली. आज खासदार उन्मेश दादा पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.जागेची पाहणी केली. उद्याच पुलाजवळचे काम सुरू करण्याचे आदेश अभियंत्याला दिले.

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now