जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑक्टोबर २०२५ । राज्यात एकीकडे रस्ते अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढतं असल्याचं दिसत असून याच दरम्यान, खानदेशातल्या नंदूरबारमध्ये सातपुड्यातील अस्तंबा यात्रेवरून परत येणाऱ्या भाविकांच्या पिकअपचा भयंकर अपघात झाला. या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला झाल्याची माहिती समोर आलीय. तर १५ पेक्षा जास्त भाविक गंभीर जखमी झाल्याचं कळतंय. अपघातानंतर परिसरात शोककळा पसरली आहे.

नेमकी घटना काय?
खरंतर राज्यासह देशभरात दीपोत्सवाला सुरुवात झाली असून आज धनतेरस असल्याने अनेकजण मंदिरात दर्शनासाठी जात आहे. पण याच धनतेरसच्या दिवशी नंदूरबारमध्ये दुखाचा डोंगर कोसळला आहे. सातपुड्यातील अस्तंबा यात्रेवरून परत येणाऱ्या भाविकांच्या पिकअपवर काळाने घाला घातला. चांदशैली घाटात पिअअपवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुर्दैवी घटना झाल्याची प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

२२ ते २३ जणांच्या पिकअपचा भयंकर अपघात झाला. या अपघातामध्ये ६ भाविकांचा जागेवरच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तर १५ पेक्षा जास्त भाविक गंभीर जखमी असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. जखमींची प्रकृती पाहता मृताची संख्या वाढू शकते, असा अंदाज स्थानिकांनी व्यक्त केला आहे.अपघातील मृत्यूच्या आकडा वाढण्याची शक्यता आहे. जखमींना तळोदा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याशिवाय तळोदा पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिसांकडून सर्व मदत केली जात आहे.









