⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

Career Tips- 10 वी 12 वी नंतर कशी कराल योग्य करिअर ची निवड? ह्या 5 टिप्स करतील मदत 

जळगाव लाईव्ह न्यूज । कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मोठा परिणाम झाला असून, तरुणांना उत्तम नोकरी साठी संघर्ष करावा लागत आहे. नुकताच बारावीचा निकाल जाहीर झाला आहे सोबत दहावीचाही निकाल लवकरच जाहीर होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर विध्यार्थी आणि पालक करिअर बद्दल खूप संभ्रमात असतात. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वतःचे मूल्यमापन करून योग्य कोर्स निवडला तर नक्कीच उत्तम नौकरी किंवा व्यवसाय करण्यात यश मिळवू शकतात.  

सर्वात आधी स्वतःबद्दल आकलन करा 

स्वतःबद्दल आकलन करताना विध्यार्थानी स्वतःची ओळख करून घेणे गरजेचे आहे यासाठी आपण कश्यात चांगले आहोत, आपण कोण आहोत, आपल्याला काय आवडते हा विचार तुम्हाला तुमचा इंटरेस्ट आणि आवडीशी जुळणारे करिअर निवडण्यात फायदेशीर ठरेल. तुमच्या आवडीशी जुळणाऱ्या क्षेत्रांची यादी करा आणि यानंतर संपूर्ण कोर्स बद्दल योग्य माहिती मिळवून निर्णय घ्या.

योग्य कोर्स  निवडा

प्रत्येक विद्यार्थांचा शालेय जीवनात कोणता न कोणता विषय हा आवडीचा असतो. जो विषय तुम्हाला जास्तीत जास्त आवडतो त्यानुसार कोर्स निवडा. यासाठी तुम्ही महागड्या महाविद्यालयातच प्रेवश घ्याव, असे नाही. यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहे जसे कि तुम्ही एखाद्या संस्थेतून पदवी शिक्षण, डिप्लोमा कोर्स, डिस्टन्स लर्निंग, वीकेंड कोर्स करू शकतात. प्रवेश घेण्याआधी तिथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून त्याबद्दल शहानिशा करून, त्यानुसार योग्य निर्णय घेऊ शकतात.

उत्तम करिअर ग्रोथची क्षमता पहा

कोणत्यातही कोर्समध्ये किंवा कॉलेज मध्ये प्रेवेश घेण्याआधी त्या करिअर ची ग्रोथ कशी होते ते तपासा. तुम्ही जर नेहमीपेक्षा वेगळा कोर्स निवडत असाल, तर भविष्यात त्याचा विस्तार आणि ग्रोथ होणाच्या शक्यतांचा जाणीवपूर्वक विचार करा. तसेच त्या क्षेत्रातील नौकरीच्या संधी आणि त्या कोर्स नंतर उच्चशिक्षण घेण्याची शक्यता याविषयी योग्य माहिती घ्या.  

हेही वाचा : बारावीनंतर काय? जाणून घ्या ‘हे’ आहेत टॉप करिअर ऑप्शन..

कोणाच्याही दबावाखाली कोर्स निवडू नका

पालक किंवा नातेवाईकांच्या दबावाखाली कोर्स किंवा कॉलेज निवडू नका, तुमची आवड आणि भविष्यातील ग्रोथ लक्षात घेऊनच कोर्स निवडलात, तर तुमचे भविष्य करिअरच्या दृष्टीने उज्ज्वल असेल. तुम्ही ज्या कॉलेज मध्ये प्रेवश घेतायेत त्याची मान्यता, प्लेसमेंट, फॅकल्टी याविषयी माहिती जरूर मिळावा.

निवडलेल्या करिअर मधील पर्याययांची पूर्तता करा  

तुम्ही निवडलेल्या कोर्स आणि करिअरची किमान पात्रता, त्याचे फायदे व तोटे, पगार आणि त्यामधील ग्रोथ ची संधी यासारख्या विविध पॅरामीटर्सवर विश्लेषण करा. त्याचबरोबर, त्या करिअर मध्ये कार्यरत असलेल्या लोकांसोबत चर्चा करा, यामुळे तुम्हाला संबंधित क्षेत्राविषयी सखोल माहिती मिळेल आणि याने तुमचा आत्मविश्स्वासही वाढेल. उदा. जर तुम्हाला क्लीनिकल रिसर्च मध्ये करिअर करायचे असेल तर त्यासंबतीत व्यक्तीकडून तुम्हाला पदवी नंतर क्लीनिकल रिसर्च मध्ये करिअरसाठी उच्चशिक्षणाचे कोणते पर्याय उपलब्ध आहेत याविषयी माहिती मिळेल सोबत त्याच्या कामाविषयी आणि करिअर ग्रोथ बद्दलही मार्गदर्शन मिळेल.