जळगाव जिल्हामहाराष्ट्र

यंदा 8 महिन्यांत लग्नाचे 52 मुहूर्त! असे आहेत विवाह मुहूर्त?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑक्टोबर २०२४ । दिवाळी सारखा सण आता आठवड्यावर येऊन ठेपला आहे. यानंतर लगेचेच तुळशीपूजन अन्‌ लग्नसराईला सुरवात होणार आहे. पुढील महिन्यात १८ नोव्हेंबरपासूनच लग्न सोहळ्याला सुरवात होणार आहे. यंदा नोव्हेंबर ते जून या आठ महिन्यांच्या काळात एकूण ५२ मुहूर्त आहेत.

पैकी फेब्रुवारीमध्ये दहा, मे महिन्यात ११ मिळून एकूण २१ असे सर्वाधिक मुहूर्त आहेत. त्याअनुषंगाने तयारी सर्वत्र सुरू झालेली आहे. विवाह सोहळा हा दोन कुटुंबांतील महत्त्वाचा आनंद सोहळा असतो. यासाठी प्रशस्त मंगल कार्यालय, वाहनतळाची व्यवस्था असलेल्या ठिकाणांना अधिक पसंती दिली जात आहे. त्यामुळे यजमान मंडळी मुहूर्त पाहून त्या दिवसासाठी मंगल कार्यालयाचे आरक्षण करू लागले आहेत. कॅटरिंग सुविधा असणारे कार्यालय सोयीस्कर ठरत आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा लग्नसराईचा कालावधी आठ महिन्यांचा आहे. खरंतर मे महिन्यात शाळा-महाविद्यालयांना सुटी राहत असल्यामुळे या दिवसांतील मुहूर्त साधण्यात येतात. गेल्या मे महिन्यात नेमके मुहूर्त नव्हते. मात्र, येणाऱ्या नवीन वर्षात मे महिन्यात मुहूर्त असल्याने त्यातील एक मुहूर्त निवडला जात आहे.

विवाह मुहूर्त असे
नोव्हेंबर -१८, २२, २५, २७
डिसेंबर-१, २, ५, ६, ११
जानेवारी- २०२५- १६, १९, २०, २३, २४, २९, ३०
फेब्रुवारी–२, ३, ७, १६, १९, २०, २१, २३, २६
मार्च –२, ३, ६, ७
एप्रिल–१६, १८, २०, २१, २३, २५, ३०
मे– १, ७, ८, ९, ११, १८, १९, २२, २३, २५, २८
जून- १, २, ३,४

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button