---Advertisement---
विशेष राष्ट्रीय

शेअर बाजारात हाहाकार, गुंतवणूकदारांचे 5 लाख कोटी बुडाले

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ फेब्रुवारी २०२२ । युक्रेनबाबत रशिया आणि पाश्चात्य देशांमधील वाढलेला तणाव आता शेअर बाजारांना घाबरवत आहे. युद्धाच्या भीतीमुळे जगभरातील गुंतवणूकदार घाबरले असून सुरक्षित गुंतवणुकीला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे सर्वच बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. त्याचा परिणाम सोमवारी देशांतर्गत बाजारातही दिसून येत आहे. आज सकाळी १०. ३० वाजेपर्यंत सेन्सेक्स १००० अंकांनी घसरला होता. तर निफ्टी ३०० हून अधिक अंकांनी घसरला आहे.

share market crash jpg webp

आज दुपारी २.३० पर्यंत सेन्सेक्स १५७२ अंकांनी आणि निफ्टी ४७६ अंकांच्या मोठ्या घसरणीने व्यवहार करत होता. SBI, ITC, ICICI बँक यांसारख्या बड्या समभागांना मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागत आहे. NSE आणि BSE वरील सर्व क्षेत्रांमध्ये घसरण झाली.

---Advertisement---

आशियाई बाजारांची स्थिती
भारतापूर्वी उघडलेल्या इतर आशियाई बाजारांमध्ये सकाळी मोठी घसरण दिसून आली. जपानच्या बाजारात 2 टक्क्यांहून अधिक घसरण दिसून येत होती, तर सिंगापूर आणि हाँगकाँगमध्येही 1.5 टक्क्यांहून अधिक घसरण दिसून आली. याआधी शुक्रवारी अमेरिका आणि युरोपचे शेअर बाजार मोठ्या घसरणीवर बंद झाले होते, ज्याचा परिणाम आज जगभरातील शेअर बाजारावर दिसून येत आहे.

गुंतवणूकदारांचे ५ लाख कोटींचे नुकसान
बाजारात झालेल्या विक्रीमुळे बँक निफ्टी निर्देशांक 3 टक्क्यांहून अधिक घसरला आहे. आयसीआयसीआय बँक, पीएनबी आणि एयू स्मॉल फायनान्स बँकेच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. बाजारातील प्रचंड विक्रीमुळे बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवलही सुमारे 5 लाख कोटी रुपयांनी घसरले.

हे देखील वाचा:

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---