⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

भुसावळच्या विकासासाठी मिळाला ५ कोटीचा निधी

जळगाव लाईव्ह न्यूज | १९ जानेवारी २०२३ |  सन 2022 -23 या आर्थिक वर्षातील तरतुदीतून लोकप्रतिनिंधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मुलभुत सेवा पुरविणे या लेखाशिर्षाखाली भुसावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील विकासकामांसाठी तब्बल पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आमदार संजय सावकारे यांनी याबाबत पाठपुरावा केला. या कामांची आगामी काळात निविदा प्रक्रिया होऊन कामांना दोन महिन्यांत सुरवात होईल, अशी माहिती आमदार सावकारे यांनी दिली आहे.

या रस्त्यांची होणार कामे
पाच कोटी रुपयांच्या कामातून राष्ट्रीय मार्ग सहा ते बोहर्डी रस्ता डांबरीकरण करणे, तळवेल ते बोहर्डी रस्त्यावरील शेती जोडरस्ता डांबरीकरण करणे, पिंपळगाव बुद्रूक येथील शास्त्री विद्यालयात शौचालय बांधकाम व पेव्हर ब्लॉक बसविणे, पिंपळगाव बुद्रूक ते करंजी रस्ता खडीकरण करणे, आचेगाव येथे सार्वजिनिक सभागृह बांधणे, पिंपळगाव बुद्रूक येथे अरुण खाचणे यांचे घर ते बाहेर वस्तीकडे जाणार्‍या रस्त्याचे डांबरीकरण करणे, सुसरी ते विल्हाळे रस्ता डांबरीकरण करणे, हतनूर विठ्ठल मंदिर समोरील जागेत सभागृह बांधणे, सावतर निंभोरा येथे गावांतर्गत पेव्हर ब्लॉक व काँक्रीटीकरण करणे, कठोर नवीन प्लॉट भागात रस्ते डांबरीकरण, कठोरा बसस्टॉप ते विठ्ठल मंदिरापर्यंत पेव्हरब्लॉक बसविणे.

या कामांचा देखील समावेश
फुलगाव ते गावापर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणे, वेल्हाळे गावांतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे, निंभोरा गावांतर्गत रस्ते काँक्रिटीकरण, फेकरी येथे सार्वजनिक सभागृह बांधकाम करणे, कंडारीतील वॉर्ड क्रमांक पाच भागातील रस्ते डांबरीकरण करणे, किन्ही येथे गावांतर्गत काँक्रीटीकरण व पेव्हर ब्लॉक, गायत्री नगरातील रस्ते डांबरीकरण करणे, शिंदी, खंडाळा, मोंढाळे, मांडवेदिगर, भिलमळी, महादेवतांडा, जोगलखोरी, सुनसगाव, गोंभी, साकेगाव येथे गावांतर्गत काँक्रीटीकरण व पेव्हर ब्लॉक बसविणे, खंडाळे येथे सार्वजनिक सभागृह बांधकाम, कुर्‍हेपानाचे मुख्य मार्गावर पेव्हर ब्लॉक बसविणे, वराडसीम येथे बसस्टँड बांधणे, बेलव्हाय मारोती मंदिराकडे जाणारा रस्ता काँक्रीटीकरण करणे, भानखेडा येथे सार्वजनिक सभागृह बांधकाम, वांजोळारोडवरील रेणूका माता मंदिर डांबरीकरण करणे, खडका येथे गट नंबर 136 मध्ये सभागृह बांधणे आदी कामे मंजूर करण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण भागात पायाभुत सुविधा मिळणार आहेत.