विहीरीत पडून ४१ वर्षीय इसमाचा मृत्यू .!

1 jpg webp

जळगाव लाईव्ह न्युज । २८ मे २०२२ । एरंडोलतालुक्यात येणाऱ्या रिंगणगाव गावात एका इसमाचा विहिरीत पडून मृत्यू झाला आहे. संजय अर्जुन पाटील वय-४१ वर्षे असे त्या इसमाचे नाव आहे. या व्यक्तीचा गावालगतच्या विहीरीत पडून मृत्यू झाला.घटणे वेळी विहीरीजवळ मृत संजय याचे बुट पडलेले मिळून आले.

विहीरीत बिलाई टाकून लोकांच्या मदतीने त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. एरंडोल पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात अली आहे,. पोलिस उपनिरीक्षक शरद बागल, हेड काँन्स्टेबल राजेश पाटील,अनिल पाटील,संदीप पाटील,विकास खैरनार हे पुढील तपास करीत आहेत.


ही घटना शनिवारी सकाळी म्हणजेच २८ मे २०२२ रोजी सकाळी घडली. याबाबत नामदेव तुकाराम पाटील यांनी एरंडोल पोलिस स्टेशनला जाऊन हि माहिती दिली. रिंगणगाव गावालगतच दिलीप नेवे याच्या शेत आहे. त्या शेतात एक विहीर आहे. शेतातील विहीरीत ही घटना घडली. घटणे वेळी विहीरीजवळ मृत संजय याचे बुट पडलेले मिळून आले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now