प्रवाशांनो लक्ष द्या : या ३६ विशेष गाड्या लवकरच होणार सुरु

एप्रिल 9, 2022 6:56 PM

railway block in kalyan kasara section

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ एप्रिल २०२२ । उन्हाळी सुट्यांमुळे रेल्वे गाड्यांना होणारी प्रवाशांची अतिरीक्त गर्दी पाहता मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि नागपूर/मालदा टाउन दरम्यान 36 साप्ताहिक उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

01033 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसनागपूर साप्ताहिक विशेष ट्रेनच्या एकूण 18 फेर्‍या होणार असून ही गाडी 9 एप्रिल ते 4 जून दरम्यान चालवण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दर शनिवारी रात्री 12.20 वाजता गाडी सुटल्यानंतर त्याच दिवशी दुपारी 3.32 वाजता नागपूरात पोहोचणार आहे. 01034 साप्ताहिक अतिजलद विशेष नागपूर-सीएसटी ट्रेन 10 एप्रिल ते 5 जून दरम्यान चालवण्यात येईल. दर रविवारी 1.30 वाजता नागपूर येथून ही गाडी सुटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसर्‍या दिवशी 4.10 वाजता पोहोचेल. या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला एक द्वितीय वातानुकूलित, पाच तृतीय वातानुकूलित, 10 शयनयान, पाच सामान्य द्वितीय श्रेणी बोगी असतील शिवाय ज्यामध्ये गार्ड ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर व्हॅन असेल.

01031 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- मालदा टाउन साप्‍ताहिक गाडीच्या 18 फेर्‍या होणार आहेत. 01031 साप्ताहिक अतिजलद विशेष गाडी 11 एप्रिल ते 6 जूनदरम्यान दर सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 11.05 वाजता सुटेल आणि मालदा टाउन येथे तिसर्‍या दिवशी 12.45 वाजता पोहोचेल तर 01032 साप्ताहिक विशेष मालदा टाऊन-सीएसटी गाडी 13 एप्रिल ते 8 जूनदरम्यान चालवण्यात येणार आहे. ही गाडी दर बुधवारी मालदा टाउन येथून 12.20 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे तिसर्‍या दिवशी 03.50 वाजता पोहोचेल. या गाडीला दादर, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, मिर्झापूर, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, पटना, बख्तियारपूर, किउल, अभयपूर , जमालपूर, सुलतानगंज, भागलपूर, कहलगाव, साहिबगंज, बडहरवा आणि न्यू फरक्का रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला एक द्वितीय वातानुकूलित, पाच तृतीय वातानुकूलित, 10 शयनयान, पाच सामान्य द्वितीय श्रेणी बोगी असतील. ज्यामध्ये गार्ड ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर व्हॅनचा समावेश आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now