⁠ 
रविवार, मे 5, 2024

बोदवड पालिकेच्या चार जागांसाठी ३५ उमेदवार

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जानेवारी २०२२ । बोदवड नगरपंचायतमधील १७ पैकी ४ जागांची निवडणूक ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने स्थगित झाली होती. यानंतर या चार जागा अनारक्षित झाल्या. तेथे आता १८ जानेवारीला मतदान होणार आहे. या जागांसाठी सोमवारी शेवटच्या दिवसापर्यंत एकूण ३५ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

या चार जागांमध्ये प्रभाग २ मध्ये सर्वसाधारण महिला, प्रभाग ३ मध्ये सर्वसाधारण महिला, प्रभाग १५ मध्ये सर्वसाधारण व प्रभाग १७ मध्ये सर्वसाधारण महिला असे आरक्षण जाहीर झाले आहे. २९ डिसेंबर ते ३ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. त्यात एकूण ३५ अर्ज दाखल झाले. त्यात प्रभाग १५ मध्ये ७, प्रभाग २ मध्ये १४, प्रभाग ३ मध्ये ९ आणि प्रभाग क्रमांक १७ मध्ये ५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

नामनिर्देशन पत्र छाननी, उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक ४ जानेवारी आहे. यानंतर १८ जानेवारीला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळात मतदान होईल. १९ जानेवारीला मतमोजणी व निकाल जाहीर होतील, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी रामसिंग सुलाने व सहाय्यक निवडणूक अधिकारी आकाश डोईफोडे व तहसीलदार प्रथमेश घोलप यांनी दिली.

हे देखील वाचा :