---Advertisement---
जळगाव जिल्हा महाराष्ट्र

अरेरे : जळगाव जिल्ह्यात तब्बल ३२७ मुलं शाळेपासून वंचित

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ डिसेंबर २०२२ । जळगाव जिल्ह्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात जिल्हाभरात एकूण ३२७ मुलं शाळाबाह्य आढळून आले आहेत. जिल्ह्यातील तालुका, गाव, वाडी, वस्तीनिहाय सूक्ष्म सर्वेक्षण करण्याकरिता तालुका, केंद्र, शाळास्तरावर आढावा बैठकी घेऊन सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळा मुख्याध्यापक, शिक्षक, जिल्हा- तालुका महिला व बालविकास अधिकारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या मार्फत जिल्ह्यात सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात एकूण ३२७ मुलं शाळाबाह्य असल्याचे आढळून आले आहेत.

शाळाबाह्य मूल jpg webp webp


त्यात शाळेत कधीही दाखल न झालेली, किंवा ज्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेले नाही अशी २०४ मुलं आढळून आले. तर एक महिन्यापेक्षा अधिक काळ सातत्याने अनुपस्थित राहत असलेले १२३ शाळाबाह्य मुलं आढळून आली आहेत.

तालुका निहाय आकडेवारी
अमळनेर – ०
भडगाव – १
भुसावळ-०
बोदवड-०
चाळीसगाव – ४३
चोपडा – ४९
धरणगाव – ०
एरंडोल – २६
जळगाव (तालुका) – ०
जळगाव (मनपा) – १२
जामनेर – २८
मुक्ताईनगर- ५८
पाचोरा – ४
पारोळा – २३
रावेर – ०
यावल – ७०
एकूण – ३२७

सन- २०२२च्या जुलै महिन्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात हि माहिती समोर आली आहे. मात्र लवकरच अजून एक सर्वेक्षण करण्यात येणार असून जिल्ह्यातील हि संख्या कमी होईल असे म्हटले जात आहे. कारण आता युद्ध पातळीवर शासन काम करत असल्याने हा एकदा आता कमी होईल असे म्हटले जात आहे.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---