⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

शेतातील झोपडीला आग लागून ३ लाखाचे नुकसान

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ एप्रिल २०२२ । पारोळा तालुक्यातील आडगाव शिवारातील शेतात असलेल्या झोपडीला आग लागली. या आगीत झोपडीमध्ये ठेवलेला २५ क्विंटल कापूस जळून खाक झाल्याने अडीच ते तीन लाखाचे नुकसान झाले आहे. दरम्यान, याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात आगीची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत असे की, प्रविण गुलाबराव पाटील (वय-३०) रा. आडगाव ता.पारोळा यांचे आडगाव शिवारातील शेत गट क्रमांक ४७ मध्ये शेत आहे. शेतात त्यांनी झोपडी बनवली असून त्या झोपडीमध्ये त्यांनी ३० क्विंटल कापूस भरून ठेवला होता. दरम्यान १ एप्रिल रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास अचानक झोपडीला आग लागल्याने आगीत जवळपास २५ क्विंटल कापूस जळून खाक झाला आहे.

यामध्ये जवळपास ३ लाख रुपये किमतीचे नुकसान झाले आहे. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात आगीची नोंद करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुधीर चौधरी करीत आहे.