⁠ 
शनिवार, मे 18, 2024

अम‌ळनेरातील रस्त्यांची कामे मार्गी लागणार, ३ कोटी निधी मंजूर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ नोव्हेंबर २०२१ । आमदार अनिल पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे वैशिष्ट्यपूर्ण अनुदान आणि ठोक अनुदानातून पालिकेला साडेसात कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. त्यात आणखी तीन कोटींची भर पडली आहे, यामुळे अमळनेर शहरातील रस्त्यांची समस्या लवकरच मार्गी लागणार आहे.

अमळनेर शहरात तीन कोटींच्या विकासकामांची मागणी नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी केली होती. दरम्यान, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी केलेल्या मागणीची दखल घेत आमदार अनिल पाटील यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निधीसाठी पाठपुरावा केला होता. आमदार अनिल पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून निधीला नुकतीच मंजुरी मिळाली आहे. वैशिट्यपूर्ण १२ कामांसाठी विशेष अनुदान योजनेंतर्गत नगरपरिषदेस ३ कोटींचा निधी वितरित करण्याचे आदेश दि.१ रोजी प्राप्त झाले आहेत. दरम्यान, नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी आणखी साडेतीन लाखांचा निधी मंजूर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

या भागात होणार कामे
नगरपरिषद हद्दीत रा.मा.१५ ते मराठा मंगल कार्यालयापर्यंत ररस्त्यालगत दुतर्फा आर.सी.सी. गटारीराह, रस्त्याचे डांबरीकरण (४० लाख), शाहआलम नगरात क्लब हाऊसचे बांधकाम (४० लाख), प्रभाग क्र. ७ मधील महात्मा फुले कॉलनीतील रस्ते काँक्रिटीकरण (२० लाख), प्रभाग क्र. ८ मध्ये रस्ता खडीकरण (१० लाख), एल.आय.सी. कॉलनीत रस्ते कॉँक्रिटीकरण (१० लाख), राधाकृष्ण नगरात रस्ता काँक्रिटीकरण (१५ लाख), प्रोफेसर कॉलनीत खुल्याचे जागेचा विकास (२० लाख), आदर्श नगरात रस्ते कॉँक्रिटीकरण (७० लाख), प्रभाग १४ मध्ये नागाईनगर भागात रस्ता खडीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरण (२० लाख), प्रभाग सातमध्ये प्रसादनगर भागात रस्ते काँक्रिटीकरण (२० लाख), आशिर्वाद नगर भागातील रस्ते कोक्रिटीकरण (१५ लाख), आर.के.नगरातील रस्ते कॉँक्रिटीकरण (२० लाख), अशी कामे करण्यात येणार आहेत.