⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

अवकाळी पावसामुळे उत्पन्न घटले ; शेतात गळफास घेऊन शेतकऱ्याने संपविले जीवन

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ डिसेंबर २०२१ । अवकाळी पावसामुळे शेतातील उत्पन्नात घट झाल्याच्या विवेंचनेतून तोंडापूर येथील एका शेतकऱ्याने शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.  ज्ञानेश्वर पांडुरंग पाटील (वय ४७) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

याबाबत असे की,जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथील येथील ज्ञानेश्वर पाटील सकाळी सातच्या सुमारास भारुडखेडा रस्त्यावरील स्वत:च्या शेतात आज सकाळी साडेआठच्या गळफास घेतला. शेता शेजारी असलेल्या संतोष गायके शेतात मजूर सोडण्यासाठी गेले असता, त्यांना बाभूळच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने ज्ञानेश्‍वर पाटील यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले.

घटनेची माहिती कळताच डिंगबर पाटील, नाना पाटील व गावकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली. दरम्यान, ज्ञानेश्‍वर पाटील यांच्यावर विविध कार्यकारी सोसायटीचे कर्ज आहे. अवकाळी पावसामुळे शेतातील उत्पन्नात घट झाल्यामुळे त्यांनी हे पाउल उचले असावे, असे गावकऱ्यांनी सांगितले. त्यांच्या मागे दोन मुले व पत्नी आहे. ते स्वत: शेतीकामे करीत होते. याबाबत पहूर पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यावरून हवालदार अनिल सुरवाडे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा ककेला. झानेश्वर पाटील तोंडापूर परिसरात कडक नाना नावाने परिचित होते.