दुचाकी खरेदीच्या बहाण्याने 28 हजारांची रोकड लंपास

ऑक्टोबर 14, 2022 5:14 PM

Bhusawal News-जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑक्टोबर २०२२ । दुचाकी घेण्याच्या बहाण्याने 28 हजारांची रोकड लांबवल्याची घटना बुधवार, 5 ऑक्टोंबर रोजी दुपारी चार वाजता भुसावळातील नाहाटा चौफुलीजवळ घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime 2022 09 03T132219.635 1 jpg webp

यावल येथील व्यापारी मोहम्मद सादीक मोहम्मद हमीद शेख (32, बाबूजीपूरा, यावल) यांच्याकडील दुचाकीची विक्री करायची असल्याने त्यांना संशयीत आरोपी शेख चाँद याने बुधवार, 5 रोजी नाहाटा चौफुलीवर बोलावले होते. दुचाकी घेवून आल्यानंतर आरोपीने मोहम्मद सादीक मो.हमीद शेख यांच्याशी झटापट करीत त्यांच्या खिशातील 28 हजारांची रक्कम लुटून पोबारा केला. तपास विजय नेरकर करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now