शेतातील विहरीत पडून २८ वर्षीय युवकाचा मृत्यू

मे 13, 2022 5:20 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मे २०२२ । शेतातील विहरीत पडून २८ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना जळगाव तालुक्यातील वराड येथे शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. राहूल भरत जाधव (वय-२८, रा. वराड ता. जि.जळगाव ) असे मयत तरुणाचे नाव असून या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे.

28 year old dies after falling into farm well jpg webp

नेमकी काय आहे घटना?
वराड येथील रहिवाशी राहूल मानसिक रुग्ण असल्याने तो अनेक दिवस घरी देखील जात नव्हता. दरम्यानं आज त्याचा हिलाल पुंडलिक नेरे यांच्या शेतातील विहरी मृतदेह आढळून आला. सकाळी मजूर शेतात काम करीत असतांना ते पाणी पिण्यासाठी हिलाल नेरे यांच्या विहरीतून पाणी काढत असतांना त्यांना विहरीत मृतदेह तरंगतांना आढळला. त्यांनी याबाबतची माहिती तात्काळ शेतमालकाला दिली.

शेतमालकासह सरपंच संदिप सुरळकर, राजेंद्र जाधव, भाऊलाल जाधव, पोलिस कर्मचारी राजेंद्र उगले यांच्यासह ग्रामस्थांनी शेतात धाव घेत पोलिसांच्या मदतीने मृतदेह विहरीतून बाहेर काढला. यावेळी तो मृतदेह राहूल जाधवचा असल्याची समजले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करुन मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. याठिकाणी मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसा अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून प्राथमिक तपास सचिन मुंढे हे करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now