जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मार्च २०२५ । महाराष्ट्र – जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने जळगाव जिल्ह्यातील तरुणांसाठी एक मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या दुसऱ्या फेरीसाठी अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू झाली असून, 21 ते 24 वयोगटातील तरुणांना विविध नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे.

जळगाव जिल्ह्यात एकूण 261 जागा उपलब्ध असून यात भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि., रिलायन्स इंडस्ट्रीज लि., इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि., टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स कंपनी लि., एचडीएफसी ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लि., बेअर क्रॉपसायन्स लि., बजाज फायनान्स लि., आदित्य बिर्ला फायनान्स लि., एचडीएफसी बँक लि., ज्युबिलंट फूडवर्क्स लि., मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लि., इंड्युसिंड बँक लि., बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनी लि., डीसीएम श्रीराम लि. यांसारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी उमेदवारांना मिळणार आहे.
या योजनेसाठी 10 वी, 12 वी, आय.टी.आय. आणि पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांनी https://pminternship.mca.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपली नोंदणी करावी आणि 31 मार्च 2025 पर्यंत अर्ज सादर करावेत. उमेदवारांना दरमहा 5000 रुपये विद्यावेतन आणि इंटर्नशिप पूर्ण झाल्यावर 6000 रुपये एकरकमी अनुदान मिळणार आहे.
तसेच भारत सरकारकडून प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत विमा संरक्षण देखील मिळणार आहे. अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी: https://pminternship.mca.gov.in ला भेट द्यावी. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्राचे सहाय्यक आयुक्त श्री. संदीप गायकवाड यांनी तरुणांना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
…
Finance