जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑक्टोबर २०२२ । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मुंबईच्या शिवाजी पार्कवर दसऱ्या निमित्त भाषण होणार आहे. तर दसरा मेळाव्याला जशास तसे उत्तर देण्यासाठी शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बीकेसी मैदानावर भाषण होणार आहे. शिंदे गटाने जोरदार तयारी सुरु केली असून जळगाव जिल्ह्यातून २५५ बसेस जाणार आहेत. शिवसेनेतर्फे दरवर्षी परंपरेनुसार शिवाजी पार्कवर मेळावा होतो. यंदा चाळीस आमदार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मेळाव्याला उत्तर म्हणून प्रतीमेळावा घेण्याचे जाहीर केले आहे. यासाठी जळगाव जिल्ह्यातून २५५ बसेस जाणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा दसऱ्यानिमित्त मुंबई येथे मेळावा होत आहे. या मेळाव्यासाठी शिंदे गटातर्फे जळगावातून २५५ बसेस बुकिंग करण्यात आल्या आहेत. या बसेस मंगळवारी दुपारी शिंदे गटाच्या कार्यकत्यांना घेऊन मुंबईकडे रवाना होणार असल्याची माहिती आहे. शिदे गटातर्फे राज्यभरातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना मुंबईत येण्यासाठी एसटी महामंडळाच्या सुमारे ४ हजार बसेस बुकिंग करण्यात आल्या आहेत.

महामंडळाच्या बसेस शिदे गटाच्या आमदारांकडील कार्यकर्त्यांना मुंबईला घेऊन जाण्यासाठी दुपारी संबंधित गावांना जाणार आहेत. या ठिकाणी कार्यकत्यांना घेऊन लगेच, या बसेस मुंबईकडे रवाना होणार आहेत. मुंबईतील मेळावा झाल्यानंतर लागलीच या बसेस रात्री जळगावकडे परतणार असल्याची माहिती आहे. मध्यवर्ती कार्यालयाने बुक केलेल्या बसचे एकत्रित भाडेही मध्यवर्ती कार्यालयाला जमा केले आहे. मध्यवर्ती कार्यालयाकडून शिंदे गटाच्या जळगाव जिल्ह्यातील आमदारांच्या कार्यकर्त्यांसाठी २५५ बसेस पुरविण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये पाचोरा येथील आमदार किशोर पाटील यांच्याकडे १०० आहेत, आमदार चिमणराव पाटील यांच्या पारोळा व एरंडोलसाठी १०० बसेस आहेत. चोपड्याच्या आमदार लता सोनवणे यांच्याकडे ५५ बसेस आहेत.












