केंद्र सरकार व मनपा मिळून उभारणार २४ दवाखाने – आ. भोळे

ऑगस्ट 1, 2022 9:22 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑगस्ट २०२२ । शहरातील स्लम भागात केंद्र शासनाच्या प्रयत्नाने विविध ठिकाणी २४ दवाखाने लवकरच उघडण्यात येणार आहे. तसेच शहरातील रस्त्यांची दुर्दशा,शिवाजी नगर उड्डाणपूल,पथदिवे,रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासंदर्भात जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांनी मनपा मध्ये सोमवारी आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत मनपातीच्या आयुक्त डॉ.विद्या गायकवाड व सर्व विभागातील प्रमुख उपस्थित होते.

या बैठकीत शहरातील विविध समस्यांवर आ भोळेंनी प्रकाश टाकत आयुक्तांसह विभाग प्रमुखांना मार्गदर्शन केले. यात केंद्र शासनाचे पत्र प्राप्त झाले असून गरीब,होतकरू पैशांअभावी दवाखान्याण्यात न जाता स्वतःच्या अंगावर आजार काढतात. हि गोष्ट केंद्राने लक्षात घेता शहरातील स्लम भागात २४ दवाखाने उभारण्यासाठी जळगाव मनपा कडून जागेची मागणी केली आहे. या मागणी नंतर त्यावर तात्काळ काम सुरु होणार आहे. यात तीन रूम व संडास बाथरूम असलेला दवाखाना असणार आहे. त्यासाठी लवकरात लवकर मनपाने जागा उपलब्ध करून देतील असा विश्वास आ.भोळेंनी व्यक्त केला.

Suresh Bhole RajuMama jpg webp

शिवाजी नगरच्या उड्डाण पुलावर शेवटचा विषय म्हणजे स्ट्रीट लाईटच बाकी आहे. या नंतर हा उड्डाणपूल येत्या आठ दिवसात रहदारीसाठी खुला करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सोबतच शहरातील रस्त्यांवर झालेली खड्डे बुजविण्याचे काम सुरु आहे. शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी मुख्यमंत्रांकडून १० कोटींची मागणी केली आहे. सोबतच शहरातील राहिलेली अमृतची कामे,बंद असलेले पथदिवे या संदर्भातही या बैठकीत चर्चा करण्यात आली असून ४२ कोटींमधले रस्त्यांचे काम पावसाळा संपताच सुरु होणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांच्या सोबत मनपाच्या आयुक्त डॉ.विद्या गायकवाड,नगरसेवक भगत बालाणी,विशाल त्रिपाठी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now