Friday, December 9, 2022

२२ वर्षीय विवाहितेची आत्महत्या, सासरच्यांनी खून केल्याचा माहेरचा आरोप

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जानेवारी २०२२ । जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे २२ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज बुधवारी सकाळी उघडकीस आलीय. प्राजक्ता अजय बारी (बुंधे) वय २२ असे मृत विवाहितेचे नाव असून तिच्या माहेरच्या लोकांनी पैशासाठी तिचा खून सासरच्या लोकांनी केला असल्याचा आरोप माहेरच्या लोकांनी केला आहे.

- Advertisement -

शिरसोली येथील अजय अशोक बारी (बुंधे) वय ३० याच्यासोबत शेंदुर्णी येथील माहेर असलेल्या प्राजक्ता हिचा ११ महिन्यापूर्वी लग्न झाले होते. अजय बारी हा तेलंगणा राज्यात मनचगुरु येथे अँब्युलस चालक म्हणून शासकीय नोकरी करतो. दोन दिवसांपुर्वी तो गावी शिरसोलीत आला होता. आज दि. १९ रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास शिरसोली येथे रहात्या घरात वरच्या मजल्यावर प्राजक्ता बारी ही गळफास घेतल्या अवस्थेत आढळून आली. तीने आत्महत्या केली की तीला गळफास दिला गेला यामुळे खळबळ उडाली आहे. मात्र शेदुर्णी येथिल प्राजक्ताच्या माहेरच्या लोकांचा आरोप आहे की , तिच्या सासरचे लोक दोन लाख रुपये हुंडा मागत होते. काही दिवसांपूर्वी तीन तोळे सोने दिले होते . या छळातूनच तिची गळफास देऊन हत्या करण्यात आली आहे. असा आरोप केला आहे.

जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, पोलीस काँ. ढवळे पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांनी पती व सासरे यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. माहेरच्या लोकांनी सांगितले की खुनाचा गुन्हा दाखल करा तर आम्ही मृतदेह ताब्यात घेऊ असी त्यांनी मागणी केली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा :

- Advertisement -
[adinserter block="2"]