दुर्दैवी : झाेप लागल्याने रेल्वेखाली येऊन २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जून २०२२ । मित्रांसोबत मुंबईला कामासाठी जाणाऱ्या तरूणाला डुलकी लागल्याने दरवाजातून पडून रेल्वेच्या चाकाखाली आल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना चाळीसगाव रेल्वे स्थानकावर रविवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

acidnet 1 jpg webp

उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथील रमेश रमग्य पासवान (वय २१) हा आपल्या मित्रांसोबत गोरखपूर-मुंबई रेल्वेने मुंबई येथे कामासाठी जात होता. रेल्वेने प्रवास करत असताना पासवान हा रेल्वेच्या दरवाजात बसलेला होता. त्याला अचानक झोपेची डुलकी आली आणि तो रेल्वेच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चाळीसगाव रेल्वे स्थानकावर १२ राेजी मध्यरात्री १२.३५ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, वैद्यकीय अधिकारी यांच्या माहितीवरून चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now