⁠ 
मंगळवार, एप्रिल 16, 2024

प्रवाशांनो लक्ष द्या! भुसावळ विभागातून धावणार मुंबई-मऊदरम्यान २० उन्हाळी विशेष गाड्या

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ एप्रिल २०२२ । मध्य रेल्वेने उन्हाळ्यात प्रवाशांची गर्दी लक्षात घेता लोकमान्य टिळक टर्मिनस ते मऊ (उत्तर प्रदेश) दरम्यान २० अतिजलद साप्ताहिक विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस येथून २८ एप्रिल ते ते ३० जूनदरम्यान दर गुरुवारी ही गाडी सव्वापाच वाजता सुटेल. मऊ येथे दुसऱ्या दिवशी १२.४५ वाजता पोहोचेल.

मऊ येथून ३० एप्रिल ते २ जुलैदरम्यान दर शनिवारी सव्वापाचला सुटेल. लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १२ वाजता पोहोचेल. कल्याण, नाशिकरोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, बिना, ओराई, कानपूर, फतेहपूर, प्रयागराज, ग्यानपूर, बनारस आणि वाराणसी येथे थांबेल.

यात वातानुकूलित, २ द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, १० शयनयान आणि ७ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असतील.