⁠ 
सोमवार, मे 6, 2024

श्वानदंश झालेल्या २ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ डिसेंबर २०२१ । भुसावळ शहरातील श्वानदंश झालेल्या २ वर्षीय बालिकेचा औरंगाबाद येथे उपचारा सुरू असतानाच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. विधी राकेश कुरकुरे (वय २) असे मृत बालिकेचे नाव आहे. या बालिकेवर बुधवारी रात्री शाेकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार झाले. या मुलीस रेबिजची लागण झाली हाेती.

याबाबत असे की, भुसावळ शहरातील तुकाराम नगरातील विधी कुरकुरे या बालिकेस माेकाट कुत्र्याने डाेक्याला चावा घेतला हाेता. बालिकेवर जळगावातील जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. तिला रेबिजची लसही दिली होती. उपचारानंतर बरे वाटल्याने तिला घरी साेडण्यात आले हाेते. मात्र विधीला पुन्हा त्रास वाटू लागल्याने तिला पुन्हा जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. प्रकृती खालावल्याने तिला पुढील उपचारांसाठी औरंगाबादला १८ रोजी हलवण्यात आले होते.

उपचार सुरू असतानाच बुधवारी (दि.२३) तिची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे बालिकेच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. शाेकाकूल वातावरणात मृत बालिकेवर बुधवारी रात्री अंत्यसंस्कार झाले. यामुळे तुकारात नगरात शोककळा पसरली होती. मृत बालिकेचे वडील वीज कंपनीत नाेकरीला आहेक. तिच्या पश्चात आई, वडील व भाऊ असा परिवार आहे. या घटनेमुळे शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

हे देखील वाचा :