⁠ 
सोमवार, मे 27, 2024

एरंडोलजवळ चार वाहनांच्या विचित्र अपघातात पाचोऱ्याचा तरुण ठार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मे २०२४ । जळगाव जिल्ह्यात अपघाताच्या घटना वाढताना दिसत असून यातच एरंडोल येथील म्हसावद रोडवरील श्री कृपा जिनिंग जवळ झालेल्या चार वाहनांच्या विचित्र अपघातात पाचोऱ्याच्या तरुणाचा मृत्यू झाला. राम कृष्ण भागवत पाटील (मुळगाव सामनेर हल्ली मु. ठाकरे कॉलनी पाचोरा) असं अपघातातील मृताचे नाव असून ही घटना आज ५ मे रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. या घटनेबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरू होते.

R j 10GB 8528 क्रमांकाचा ट्रक एरंडोल कडून म्हसावद कडे जात असताना सदर ट्रकला MH DQ8174 क्रमांकाची मोटर सायकल जात असताना ट्रकला ओव्हरटेक करत असताना समोरून येणाऱ्या माणसावर कडून एरंडोल कडे MH 19 V1267 क्रमांकाच्या रिक्षाला म्ह18बीसी1408 ईरटीका या वाहनाने ओव्हरटेक करताना दोघेही ओव्हरटेक करत असताना समरासमोर वाहनांची धडक होऊन दुचाकीस्वार रामकृष्ण भागवत पाटील हा युवक जागीच गतप्राण झाला

मृत युवक हा कुटुंबातील एकुलता एक होता अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. यावेळी गणेश पाटील खेडी राजू भावसार एरंडोल विठ्ठल वंजारी एरंडोल तसेच उमरजे येथील काही ग्रामस्थ यांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले दरम्यान पोलीस उपनिरीक्षक शरद बागल व त्यांचे सहकारी सदर घटनेची माहिती मिळताच तत्परतेने अपघात स्थळी दाखल झाले. सदर युवक हा सुशिक्षित बेरोजगार असून रोजगारासाठी जळगाव येथे मुलाखत देऊन घराकडे परत जात होता यावेळी वाटेवरच क्रूळ काळाने त्याच्यावर घाला घातला