अज्ञात वाहनाच्या धडकेत बेलवाय येथील १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ एप्रिल २०२१ । अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत बेलवाय येथील १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना १८ रोजी घडली. मयूर नरहरी खाचणे (वय-१९ रा. बेलवाय ता.जि.जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत असे की, तालुक्यातील बेलवाय येथील मयूर खाचणे हा काल रविवारी १८ एप्रिल रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास ट्रक्टरसाठी डिझेल घेण्यासाठी तो दुचाकीने नशिराबाद येथे येत होतो. दरम्यान मन्यारखेडा आणि नशिराबाद दरम्यानच्या रस्त्यावरून जात असतांना समोरून अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात मयूर खाचणे गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जळगावातील खासगी रूग्णालयात दाखल केले. 

सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास मयूरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मयूर मयत झाल्याचे कळताच नातेवाईकांनी आक्रोश केला होता. याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी विकास गायसमुद्रे यांच्या खबरीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि गणेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. रविंद्र इंधाटे करीत आहे.