१६ वर्षीय अल्पवयीन मुलीस पळविले, पोलिसांत नोंद

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मे २०२२ । एरंडोल तालुक्यातील विखरण येथील १५वर्षे ९महीने या अल्पवयीन मुलीला काहीतरी आमीष दाखवुन फूस लावुन संशयीत आरोपी रोहीत वामन भिल याने २७ रोजी राञी पळवुन नेल्याची घटना घडली. या प्रकरणी २८ रोजी मुलीच्या वडीलांनी एरंडोल पोलिसांत फिर्याद दिली.

विखरण येथील अल्पवयीन मुलगी घरात शौचालयाला जाते असे सांगून घरातून निघुन गेली. तीचा शोध घेतला असता विखरण गावातील रोहीत वामन भिल हा देखिल घरातून बेपत्ता असल्याचे आढळुन आले. त्यामुळे त्याने काही तरी फूस लावून अल्पवयीन मुलीला पळवून नेले अशी, फिर्यादी मुलीच्या वडिलांनी एरंडोल पोलिसंत दिली असून पोलीस उपनिरीक्षक शरद बागल,हेड काँन्स्टेबल राजेश पाटील,मिलींद कुमावत,जुबेर खाटीक, अकील मुजावर,संतोष चौधरी हे पुढील तपास करीत आहेत.