⁠ 
शनिवार, मे 4, 2024

जळगाव शहरातील विकास कामासाठी आ. भोळेंच्या निधीतून १५ कोटींची कामे सुरु

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ नोव्हेंबर २०२३ । आमदार सुरेश भोळे यांच्या निधीतून शहरातील रिंगरोड, हरेश्‍वर नगर, गंधर्व कॉलनीसह प्रभाग क्रमांक सातमध्ये विविध विकास कामासाठी १५ कोटी निधी मंजूर झाला आहे.त्यातून कामे सुरू असल्याची माहिती माजी नगरसेविका सीमा सुरेश भोळे यांनी दिली

सीमा भोळे म्हणाल्या, की शहराच्या विकासासाठी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार सुरेश भोळे यांच्या प्रयत्नातून राज्य सरकारकडून निधी मंजूर झाला आहे.त्यात जळगाव महापालिका प्रभाग क्रमांक सात मधील विविध विकास कामासाठी १५ कोटी रूपयांच्या निधीचा सामावेश आहे. रिंगरोड, हरेश्‍वर नगर, गंधर्व कॉलनी या प्रमुख रस्त्याच्या कामाचा तसेच खुल्या जागा सुशोभीकरण, प्रकाश व्यवस्था, खुल्या जागेत खेळणी पुरवणे, गटारीचे बांधकाम आदी कामे त्यामध्ये समाविष्ट आहेत.

त्यापैकी काही कामे पूर्ण झाली आहेत. काही कामाचे कार्यादेश देण्यात आले आहेत. त्या कामांना सुरूवात होत आहे. नागरिक महापालिकेला कर भरतात, त्यामुळे रस्ते, गटारीसारख्या मूलभूत सुविधा पुरवणे महापालिका प्रशासनाचे काम आहे. आम्ही राज्य सरकारकडे पाठपुरावा करून व नागरिकांची भेट घेवून ती कामे पूर्ण करण्याची हमी देत आहोत.

राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार आल्यापासून आमदार भोळे यांनी जळगाव शहरात प्रत्येक प्रभागासाठी मोठ्या प्रमाणात व समान निधी आणण्याचे काम केले. नुकतेच ५६ कोटी रूपयांच्या कामांचे कार्यादेश प्राप्त झाले असून कॉलनी भागातील रस्त्याच्या कामांना लवकर सुरूवात होईल.

शहरातील कलेक्टर रस्त्यासाठी २० कोटी रूपयांचे कार्यारंभ आदेश दोन दिवसापूर्वी प्राप्त झाले आहेत. त्याच्या कामांना लवकरच सुरूवात होईल. इच्छादेवी ते रायसोनी कॉलेजकडे जाण्याऱ्या मुख्य काँक्रीट रस्त्याचे काम अंतीम टप्प्यात आहे.