⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

पाचोरा-भडगाव शहरासाठी १५ कोटींचा निधी

जळगाव लाईव्ह न्यूज । विजय बाविस्कर । पाचोरा -भडगांव शहरातील विविध विकास कामासाठी 15 कोटींची मंजुरी मिळाल्याची माहिती आ. किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ज्या भागात रस्ते व इतर विकास काम होणार आहें ते – शासन निर्णय क्रमांक- नपावै-२०२२/प्र.क्र.४१६/नवि-१६, दि. १८ नोव्हेंबर, २०२२ सोबतचे विवरणपत्र भडगांव नगर परिषद / पाचोरा नगर परिषद क्षेत्रातील कामे भडगांव नगर परिषद ता. भडगांव जि. जळगांव

भडगांव नगरपरिषद कामाचे नाव
भडगांव नगरपरिषद हद्दीतील आदर्श कन्या विद्यालय ते नविन कोर्ट पर्यंत कोल्हा नाला लगत रिटेनिंग वॉल (सरंक्षण भिंत) बांधकाम करणे – १५० लक्ष, भडगांव नगरपरिषद हद्दीतील इंदर कॉम्पेक्स ते एम.के. पाटील यांच्या घराकडे जाणारा रस्ता काँक्रिटीकरण व चौक सुशोभिकरण करणे- ५० लक्ष, भडगांव नगरपरिषद हद्दीतील पारोळा रोड ते भवानी मंदीराकडे जाणारा रस्ता काँक्रिटीकरण करणे-५० लक्ष, भडगांव नगरपरिषद हद्दीतील न.पा. स्वच्छता पार्क ते यशवंत नगर मधील खदानीकडे जाणारा रस्ता काँक्रिटीकरण करणे- ५० लक्ष, भडगांव नगरपरिषद हद्दीतील सहस्त्रबुध्दे गल्ली समोरील बुरुज ते इदगाह मैदानवरुन जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे ५० लक्ष, भडगांव नगरपरिषद हद्दीतील मारुती मंदीरपासुन ते अँग्लो उर्दु शाळा ते सुर्यवंशी डेअरीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे ५०लक्ष, भडगांव नगरपरिषद हद्दीतील नवनाथ टेकडी ते काशिनाथ नगर कडे जाणारा रस्ता काँक्रिटीकरण करणे ५० लक्ष, भडगांव नगरपरिषद हद्दीतील वार्ड नं. ८ साई नगर अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे ५० लक्ष, असे एकुण रक्कम रुपये ५ कोटी रूपये

पाचोरा नगर परिषद कामाचे नाव
नगरपरिषद मालकीच्या सि.स.नं. ३९७४/३/२/१ पैकी मधील क्षेत्र १५६०.०० चौ.मी. जागेवर स्व. तात्यासाहेब आर. ओ.पाटील व्यापारी भवनाचे बांधकाम करणे ५००.०० लक्ष,चिंतामणी कॉलनीत डॉ. गणेश राठोड यांच्या घरापासून ते एकनाथ पाटील यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करणे -७५ लक्ष,चिंतामणी कॉलनीत श्री. व्हि. एन. पाटील यांच्या घरापासून ते जयकिरण प्रभाजी शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करणे-७५ लक्ष,पाचोरा शहरात पुनगांव रोड ते नॅशनल हायवेला जोडणारा डि. पी. रोड लगतचा पक्का कॉक्रिटचा नाला बांधकाम करणे -१०० लक्ष,प्रभाग क्र. ८ मधील रोड ते सार्वजनिक बांधकाम विभाग, शासकीय विश्रामगृहाकडे जाणाऱ्या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करणे -१०० लक्ष,प्रभाग क्र. ७ मधील संभाजी राजे चौक ते इंदिरा नगर कडील राष्ट्रीय महामार्ग पर्यंत रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण करणे – ७० लक्ष,पाचोरा नगरपरिषद हद्दीतील प्रभात ७ मधील यशोदा नगर,संगिता निवास ते जैन स्थानक पर्यंत रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण करणे -४० लक्ष, नितीन चौधरी यांच्या घरापासुन ते पंढरी पाटील यांच्या घराकडील रिंग रोडला जोडणारा रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण करणे-४० लक्ष, असे एकुण रक्कम रुपये रक्कम १० कोटी