जळगाव लाईव्ह न्यूज । २५ फेब्रुवारी २०२२ । जळगाव तालुक्यातील एका भागात राहणाऱ्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले. याप्रकरणी एकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील एका भागात राहणारी १२ वर्षीय मुलगी आपल्या आई-वडिलांसह वास्तव्याला आहे. मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. बुधवार २३ फेब्रुवारी रोजी दुपारी २ ते ४ वाजेच्या दरम्यान गावातील राजू नामदेव पवार याने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले आहे संशय व्यक्त केला आहे.
यासंदर्भात पिडीत मुलीच्या आईने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुरूवार २४ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता संशयित आरोपी राजू पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे करीत आहे.
हे देखील वाचा :
- या राशींचे आज नशीब सूर्यासारखे चमकेल, नवीन संधींची दारे उघणार; वाचा आजचे राशिभविष्य
- तूरचा भाव प्रति क्विंटल 5 हजारांनी घसरला; शेतकऱ्यांना मोठा फटका
- Jalgaon : शेतीतून उत्पन्न नाही, कर्जफेडीची चिंता, घरात कोणी नसताना शेतकऱ्याने उचललं धक्कादायक पाऊल
- वाल्मिक कराडवर अखेर मकोका; कोर्टात नेमकं काय झालं?
- मध्यमवर्गीयांसाठी ‘या’ आहेत पाच परफेक्ट कार; किंमतही बजेटच्या बाहेर जाणार नाही!