⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

मनपाचे सभागृह होणार आलीशान : ५ कोटींचा केला जाणार खर्च !

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जुलै २०२२ । महापालिकेच्या १७ मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल सभागृह आता आजुनच आलीशान होणार आसुन यासाठी ५ कोटींचा खर्च करण्यात य़ेणार आहे. तब्बल १०० नगरसेवक बसतील ईतकी याची क्षमता असणार असुन याठीकाणी अत्याधुनिक यंत्रणा बसवली जाणार आहे.

या सभागृहासाठी ५ कोटींची तरतुद करण्यात आली आहे. सी.एस.आर फंडातुन हे काम करण्यात येणार आहे. वास्तुविशारद नीरज मंत्री यांनी आराखडा सादर केला. त्याला मंजुरी देण्यात आली. निविदा काढून सप्टेंबरमध्ये कामाला सुरवात होण्याची शक्यता आहे.

महापौर जयश्री महाजन यांच्या दालनात नूतनीकरण आराखडा मंजुरीसाठी बैठक झाली.उपमहापौर कुलभूषण पाटील, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक अश्‍विन सोनवणे, गटनेते राजेंद्र घुगे-पाटील, विशाल त्रिपाठी, आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे, वास्तुविशारद मंत्री व अधिकारी उपस्थित होते.

महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी सांगितले, की महासभेत सभागृह नूतनीकरणाचा ठराव मंजूर केला होता. त्यासाठी पाच कोटी रुपये सीएसआर फंडातून खर्च करण्यात येतील. महापालिकेत सद्यस्थितीत ७५ नगरसेवक बसण्याची सुविधा आहे. आगामी काळात प्रभाग वाढीसह नगरसेवकांची संख्या वाढण्याचे लक्षात घेऊन तब्बल १०० नगरसेवक बसण्याची सुविधा करण्यात येईल.