जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जानेवारी २०२२ । घरगुती भांडणातून मुलाने आईला चाकू मारुन जखमी केल्याची घटना शहरातील पिंप्राळा हुडको येथे घडली आहे. याप्रकरणी मुलाविरोधात रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

पिंप्राळा हुडको परिसरात महापालिकेच्या दवाखान्याच्या मागे शमीम बानो शेख पिरन (वय ४०) या राहतात. याच ठिकाणी त्यांचा मुलगा तन्वीर शेख जलील (वय २३) हा देखील राहतो. रविवारी त्यांच्या घरात किरकोळ वाद झाला. घरगुती भांडणाच्या कारणावरून तन्वीरने आई शमीम हिच्या उजव्या हातावर भाजी कापण्याचा चाकू मारून दुखापत केली. तसेच मारून टाकण्याची धमकी दिली.

शमीम बानो शेख पिरन यांनी दिलेल्या तक्रारीवरुन त्यांचा मुलगा तन्वीर शेख जलील याच्या रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस नाईक ज्ञानेश्वर पाटील करीत आहेत.
हे देखील वाचा :
- एरंडोलमधील ३ कुख्यात गुन्हेगार जळगाव जिल्ह्यातून तडीपार
- सालदाराकडून वृद्ध मालकिणीचा बेल्टने गळा आवळून खून ; रावेरातील घटनेने खळबळ
- तरसोद-पाळधी बायपासवर पुन्हा भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू
- मावशीच्या घरावरच भाच्याचा डल्ला! रावेरातील घरफोडीचा छडा; दोघे जेरबंद
- निंभोरा पोलिसांची मोठी कारवाई! तीन घरफोड्यांचा उलगडा, ५ चोरटे जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त हस्तगत







