रामेश्वर कॉलनीतून १२ वर्षीय मुलगा बेपत्ता;अपहरणाचा संशय

एप्रिल 21, 2022 2:23 PM

जळगाव लाईव्ह न्यूज। २१ एप्रिल २०२२ । येथील रामेश्वर कॉलनी परिसरातुन अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime २ 1 jpg webp

पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील हनुमान नगर भागात वास्तव्यास असलेला देवेंद्र मनोज कोळी (वय-१२) हा रविवारी १७ एप्रिल रोजी सायंकाळी घराबाहेर पडला मात्र बराच वेळ होऊन देखील तो घरी परतला नाही. तीन दिवस उलटूनही मुलगा मिळून न आल्याने अखेर देवेंद्र याची आई लक्ष्मी कोळी यांनी एमआयडीसी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. मुलाला काही तरी आमिष दाखवून अज्ञात व्यक्तीने त्याचे अपहरण केल्याचा संशय तक्रारीत नमूद करण्यात आला आहे. बुधवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक दिपक जगदाळे हे करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now