भडगाव

Bhadgaon : झोपडीत बांधलेल्या 11 बकऱ्यांचा हिंस्त्रप्राण्याने पाडला फडशा ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | २४ सप्टेंबर २०२३ । भडगाव तालुक्यातील पिचर्डे परिसरात हिंस्त्रप्राण्याची दहशत बघावयास मिळत आहे. हिंस्त्रप्राण्याने झोपडीत बांधलेल्या ११ बकऱ्यांचा फडशा पाडल्याचे समोर आले असून महिलेचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

भडगाव तालुक्यातील पिचर्डे येथील नर्मदाबाई सहादु भिल यांच्या घरासमोरील झोपडीत रात्री बांधलेल्या ११ बकऱ्यांना हिंस्रप्राणीने फडसा पाडला. अतिशय गरीब परिस्थितीतुन नर्मदाबाई भिल यांनी एवढ्या ११ बकऱ्या एक एक रुपया जमवून एवढ्या घेतल्या होत्या. आज सकाळी वनविभागचे वनरक्षक दुर्गादास वानखेडे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. पंचनामा करून शासनाकडून तातडीने मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button