जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जुने २०२५ । आषाढी एकादशी यात्रेनिमित्त पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरपूरला जाणार्या भाविकांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागाच्यावतीने बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यातून १०० बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. वारकऱ्यांची संख्या वाढल्यास एसटीच्या फेऱ्यांत वाढ केली जाणार आहे.

विशेष म्हणजे, भाविकांनी ४० जणांचा ग्रुप तयार करून एसटीचे बुकिंग केल्यास थेट गावात एसटी येणार आहे. जळगाव एसटी विभागाने विशेष फेऱ्या सुरू केल्या आहेत. त्यासाठी जवळच्या आगारात जाऊन अर्ज करून, सर्व प्रवाशांची माहिती देऊन एसटी बुक करता येणार आहे. त्यामुळे भाविकांची मागणी वाढत आहे.

प्रवासी सवलतदेखील लागू असणार
एसटी बुक करताना महिला सन्मान योजना, ज्येष्ठ नागरिक योजनेनुसार ५० टक्के तिकीट दर सवलत लागू असेल. तर अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेंतर्गत ७५ वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवासदेखील लागू असणार आहे.







