आज भुसावळ विभागातून धावणाऱ्या 10 रेल्वे गाड्या‎ रद्द, 16 गाड्यांच्या मार्गात बदल

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मार्च २०२३ । होळीसारखा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यात रेल्वे प्रशासनाकडून अनेक रेल्वे गाड्या रद्द केल्या जात असल्याने प्रवाशांची गरसोय होत आहे. अशातच आता भुसावळ विभागातून धावणाऱ्या 10 रेल्वे गाड्या‎ आज म्हणेजच रविवारी रद्द केल्या आहेत. तर दोन गाड्या या‎ शाॅर्ट टर्मिनेट केल्या असून, १६ गाड्यांचे मार्ग‎ बदलले आहेत.‎

आज या गाड्या रद्द?
पश्चिम रेल्वेच्या उधना यार्ड रिमॉडेलिंग आणि‎ एनईच्या कामामुळे ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे आज पश्चिम रेल्वेतून‎ सूरतकडून येणाऱ्या व जाणाऱ्या १० रेल्वे गाड्या‎ रद्द केल्या आहेत. त्यात (२२१३७)‎ नागपूर-अहमदाबाद एक्सप्रेस, (०९०५१)‎ मुंबई-भुसावळ स्पेशल फेअर एक्स्प्रेस,‎ (२०९२५) सुरत-अमरावती एक्सप्रेस,‎ (१९००५) सुरत-भुसावळ एक्स्प्रेस, (१११२७)‎ भुसावळ-कटनी एक्स्प्रेस (साेमवारी िद. ६‎ रोजी) या गाड्यांचा समावेश आहे. तसेच अप‎ मार्गावरील गाड्यांमध्ये (२२१३८)‎ अहमदाबाद-नागपूर एक्सप्रेस, (२०९२६)‎ अमरावती-सुरत एक्सप्रेस, (१९००७)‎ सुरत-भुसावळ एक्स्प्रेस, (१९००६)‎ भुसावळ-सुरत एक्स्प्रेस या गाड्या रद्द झाल्या‎ आहेत. तसेच (१११२८) कटनी – भुसावळ‎ एक्स्प्रेस ही गाडी मंगळवारी (दि. ७) कटनी‎ येथून सुटणारी गाडी रद्द केली आहे.‎

या गाड्यांच्या मार्गात बदल‎?
तसेच काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. त्यात (१९०४५) सुरत-छपरा ही गाडी रविवारी (दि.‎ ५) सुरतहून सुटणार आहे, ती वडोदरा, रतलाम,‎ संत हिरदारामनगर मार्गे धावणार आहे. ओखा‎ – शालीमार – ओखा ही गाडी रविवारी‎ छायापुरी, नागदा, मस्की जंक्शन, संत‎ हिदारामनगर, भोपाळ, इटारसी, नागपूरमार्गे‎ धावणार आहे. राजकोट-रिवा ही गाडी रविवारी‎ छायापुरी, नागदा, मस्की जंक्शन, संत‎ हिरदारामनगर, भोपाळ, इटारसी मार्गे वळवली‎ आहे. अहमदाबाद – चेन्नई ही गाडी‎ अहमदाबादहून सुटेल, रविवारी छायापुरी,‎‎‎‎‎‎ नागदा, मस्की जंक्शन, संत हिरदारामनगर,‎ भोपाळ, इटारसी, नागपूर, वर्धा मार्गे वळवली‎ जाईल, अहमदाबाद-हावडा ही गाडी रविवारी‎ अहमदाबादहून सुटणार आहे, ती छायापुरी,‎ नागदा. मस्की जंक्शन, संत हिरदारामनगर,‎ भोपाळ, भुसावळमार्गे वळवली जाईल,‎ अहमदाबाद-बरौनी ही गाडी सोमवारी (दि. ६)‎ अहमदाबादहून सुटणारी गाडी छायापुरी, नागदा,‎ मस्की जंक्शन, बिनामार्गे वळवली जाईल,‎ अहमदाबाद-पुरी ही गाडी रविवारी‎ अहमदाबादहून सुटेल, ती छायापुरी, नागदा मार्गे‎ वळवली जाईल. मस्की जंक्शन, संत हिदाराम‎ नगर, भोपाळ, भुसावळ मार्गे जाणार आहे.‎‎‎‎‎‎ चेन्नई – अहमदाबाद गाडी शनिवारी (दि. ४‎ मार्च) भुसावळ कॉर्ड लाईन, अकोला, भोपाळ,‎ संत हिरडाराम नगर, माकसी, नागदा,‎ छायापुरीमार्गे वळवली आहे.

छपरा – सुरत ही‎ गाडी शनिवारी (दि. ४) छपरा येथून निघेल, ती‎ भोपाळ, माकसी, रतलाम, गोध्रा, वडोदरा, सुरत‎ मार्गे वळवली जाईल. पुरी अहमदाबाद पुरीहून‎ सुटणारी गाडी शनिवारी (दि. ४) भुसावळ‎ कॉर्ड लाइन, अकोला, भोपाळ, माकसी, नागदा,‎ छायापुरी मार्गे वळवली जाईल. मालदा टाउन -‎ सुरत ही गाडी मालदा टाउनहून शनिवारी (दि.‎ ४) निघेल. ही गाडी भुसावळ कॉर्ड लाइन‎ अकोला, भोपाळ, संत हिरडाराम नगर,‎ माकसी, नागदा, वडोदरा मार्गे वळवण्यात येईल.‎ वांद्रे टर्मिनस – सहरसा ही गाडी वांद्रे‎ टर्मिनसवरून सुटेल शनिवारी (दि. ४)‎ वडोदरा, नागदा, मकसी, भोपाळ, इटारसी मार्गे‎ वळवली आहे.

रिवा-एकतानगर ही गाडी‎ शनिवारी (दि. ४) इटारसी, भोपाळ, माकसी,‎ नागदा, वडोदरा मार्गे वळविली आहे. पुरी –‎ गांधीधाम ही गाडी पुरीहून सुटणार असून‎ शनिवारी (दि. ४), शालीमार – पोरबंदर ही‎ गाडी शालिमारहून सुटणार असून शनिवारी‎ (दि. ४) भुसावळ कॉर्ड लाइन अकोला,‎ भोपाळ, रतलाम, छायापुरी मार्गे वळवली आहे.‎ सुरत-छपरा क्लोन सुरत आर ही गाडी सोमवारी‎ (दि. ६) वडोदरा, नागदा, संत हिरडाराम नगर,‎ भोपाळ, इटारसी मार्गे वळविली आहे. काचेगुडा‎ – बिकानेर ही गाडी शनिवारी (दि. ४)‎ काचेगुडा आर ही गाडी अकोला, खंडवा,‎ भोपाल, रतलाम, चित्तोरगढमार्गे वळवली आहे.‎

ब्लॉकमुळे शाॅर्ट टर्मिनेट केलेल्या गाड्या अशा
‎(१९००६)भुसावळ – सूरत ही उकाई सोनगढ पर्यंत धावेल आणि उकाई सोनगढ-सूरत दरम्यान ही‎ गाडी रविवारी रद्द केली आहे. तसेच डाऊन मार्गावरील(१९० ०८) भुसावळ -सुरत ही गाडी‎ रविवारी(दि. ५) बारडोलीहू न शॉर्ट टर्मिनेट हाेईल. एकच दिवस हा बदल केला आहे.‎