बातम्या
एरंडोल तालुक्यातील अल्पसंख्यांक वस्ती विकास कामांसाठी १ कोटीचा निधी
जळगाव लाईव्ह न्यूज । २ एप्रिल २०२२ । एरंडोल शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात अल्पसंख्यांक वस्तीमधील नागरिकांच्या विकास कामांसाठी १ कोटीचा निधी शासन निर्णयानुसार मंजूर झाला आहे. यासाठी आमदार चिमणराव पाटील यांनी सतत पाठपुरावा केला असून अखेर पाटीलांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
तालुक्यातील अल्पसंख्यांक वस्ती विकास कामांसाठी १ कोटीचा निधी मजूर झाली असून यामुळे अल्पसंख्यांक वस्तीच्या सुधारणेसाठी मोठी मदत होणार आहे. दरम्यान मूलभूत सुविधांअभावी अल्पसंख्यांक वस्तीतील नागरिक कमालीचे त्रस्त झाले होते. आता रस्ते गटारी पिण्याच्या पाण्याची सुविधा यांच्यासह इतर प्राथमिक सुविधांची कामे पूर्ण होणार आहेत. तसेच या वस्त्यांमधील नागरिकांची दैनंदिन त्रासातून मुक्तता होणार आहे.