---Advertisement---
बातम्या

धरणगावातील ठाकरे गटातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश !

---Advertisement---

गुलाबभाऊंच्या प्रचंड विजयासाठी कार्यकर्त्यांनी बांधला चंग

Dharangaon SV

जळगाव लाईव्ह न्यूज । धरणगाव शहरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी मंत्री तथा महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर असलेला विश्वास आणि त्यांच्या कामाची तडफ व जनसंपर्क यामुळे शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, “शिवसेना हा केवळ पक्ष नसून एक विचारधारा आहे, सर्वसामान्यांना विकासासाठी एकसमान न्याय धेण्याचे काम केले आहे.भगव्या झेंड्याची शान आणि धनुष्यबाणासाठी सर्वांनी कार्यतत्पर राहण्याचे आवाहन केले.

---Advertisement---

यांनी केला सेनेत प्रवेश
शिवसेनेचे नेते व मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत अमोल कंखरे, दिनेश धनगर, राजू धामोळे, भैय्या कंखरे, चेतन पाटील, भोला सूर्यवंशी, आनंद सूर्यवंशी, विशाल धनगर, शिव लोखंडे, अजय चौधरी, राहुल धनगर, दौलत धनगर, प्रवीण धनगर, सतीश धनगर, भरत सूर्यवंशी, गणेश धनगर, वंश पाटील, सागर धनगर,साईराज धनगर, ज्ञानेश्वर धनगर, कृष्ण धनगर, कृष्णा पाटील, तुषार नाईक, तुषार धनगर, दारा धनगर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

यांची होती उपस्थिती
या प्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख माजी नगराध्यक्ष पी. एम. पाटील सर, गट नेते पप्पू भावे, शहर प्रमुख विलास महाजन, नगरसेवक वासुदेव चौधरी, अभिजीत पाटील, उपतालुका प्रमुख संजय चौधरी, वाल्मीक पाटील, तोसिफ पटेल, सद्दाम पठाण, हेमंत चौधरी, पप्पू कंखरे, संभाजी कंखरे, भावेश पाटील आदी उपस्थित होते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---