सोने पुन्हा पन्नाशीच्या दिशेने, आज झाली तब्बल ‘इतकी’ मोठी वाढ, वाचा प्रति तोळा

फेब्रुवारी 18, 2022 9:49 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जानेवारी २०२१ । देशभरात आज कोरोनाचे ३ लाखाहून अधिक बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीची वातावरण पसरले आहे. गेल्या काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या दरात आलेख चढताच आहे. जळगाव सराफ बाजारात आज सलग सोन्याच्या(Gold Rate) दरात मोठी वाढ झाली असून सोने पुन्हा ५० हजाराच्या दिशेने जाऊ लागले आहे. तर चांदीच्या (Silver Rate) दरात देखील मोठी वाढ नोंदविली गेलीय. आज १० ग्रॅम सोन्याच्या भावात किंचित ४६० रुपयाची वाढ झाली आहे. तर चांदीच्या १४१० रुपयाची वाढ झाली आहे. त्यापूर्वी काल सोने किंचित १० रुपयाने महागले होते तर चांदी तब्बल ११५० रुपयांनी महागले होते.

gold silver price jalgaon

आज गुरुवारी जळगाव सराफ बाजारात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ४९,५१० इतका आहे. तर चांदीचा प्रति किलोचा भाव ६५,९१० रुपये इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ होते.

सध्या भारतात ओमिक्रॉनसह कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. राज्यात देखील कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. आगामी काळात वाढत्या रुग्ण संख्येने पुन्हा लॉकडाऊन लागण्याच्या भीतीने गुंतवणूकदार धास्तावले आहे. गेल्या आठवड्यात जळगाव सराफ बाजारात चांदीच्या दरात सलग वाढ दिसून आली. चांदी १६०० रुपयांनी महागली होती. तर गेल्या आठवड्यात सोने ३ वेळा महागले होते. त्यात ३०० रुपयाची वाढ झाली होती. परंतु या आठवड्याच्या सलग सोन्याचा भाव वाढत असल्याचे दिसून आले गेल्या चार दिवसात सोने ६४० रुपयाने महागले तर चांदी ३१८० रुपयांनी महागली आहे.

आठवड्यातील सोने चांदीचे दर?
१७ जानेवारी (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,९०० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६३,०५० रुपये असा होता. १८ जानेवारी (मंगळवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,०४० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६३,३५० रुपये इतका नोंदविला गेला. १९ जानेवारी (बुधवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,०५० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६४,५०० रुपये इतका नोंदविला गेला

सोन्याची शुद्धता ‘अ‍ॅप’ वर?
केंद्रीय ग्राहक आणि अन्न मंत्रालयाने BIS-केअर मोबाईल अ‍ॅप लाँच केलं आहे. या अ‍ॅपद्वारे सोनं खरंच किती शुद्ध आहे, याबाबतची माहिती मिळणार आहे. त्यामुळे सोन्यात इतर धातूंच मिश्रण करुन लुबाडणाऱ्यांना चांगलाचा धडा मिळणार आहे. सोनं कितपत शुद्ध आहे, याची खरंच योग्य माहिती दिली तर या अ‍ॅपला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now