शिंदे फडणवीस करणार महाराष्ट्र दौरा : जळगावात कधी?

ऑक्टोबर 26, 2022 4:46 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑक्टोबर २०२२ । येत्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या करणार आहेत, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दौरा करण्याआधी शिंदे आणि फडणवीस दौरा करणार आहेत. मात्र हा दौरा कधी होणार? त्यातही जळगाव जिल्ह्यात कधी येणार हे नक्की झाले नाहीये.

shinde and fadanvis jpg webp

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याची माहिती समोर येत आहेत. उद्धव ठाकरे हे राज्याचा दौरा करणार आहेत. उद्धव ठाकरेंचा दौरा जाहीर झाल्यानंतर शिंदे-फडणवीसांनी एकत्रित दौरा आयोजित केला आहे. ठाकरेंच्या दौर्‍यापूर्वी शिंदे-फडणवीसांच्या दौर्‍याला सुरूवात होणार आहे. शनिवारपासून नंदुरबार मधून महाराष्ट्र दौर्‍याला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

अलीकडेच औरंगाबाद येथे शेतकर्‍यांच्या भेटीला उद्धव ठाकरे गेले होते. उद्धव ठाकरेंच्या या दौर्‍यामुळे शिंदे-फडणवीस सरकारवर टीका देखील झाली. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा सुरू होण्याआधीच शिंदे फडणवीस महाराष्ट्र दौरा करणार असल्याची माहिती समोर येत आहे. ठाकरे गटाचे बालेकिल्ले असलेल्या भागात करणार शिंदे फडणवीस एकत्रित दौरा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now