⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

शहरातील रस्त्यांची कामे उत्कृष्ट दर्जाची करा – महापौर जयश्री महाजन

जळगाव लाईव्ह न्युज | ६ एप्रिल २०२२ | जळगाव शहरातील सुरु असलेली रस्त्यांची कामे ही उत्कृष्ट दर्जाची व्हायला हवीत. निकृष्ट दर्जाची कामे करत असलेल्या ठेकेदारांवर कारवाई करा असे आदेश महापौर जयश्री महाजन यांनी जळगाव शहरातील अभियंत्यांना दिले आहेत. जळगाव शहरातील सुरू असलेल्या कामाची आढावा बैठक महापौर जयश्री महाजन यांनी महापौर दालनात बुधवारी घेतली.

यावेळी बोलताना अभियंत्यांना त्या म्हणाल्या की, जळगाव शहर मनपा मध्ये काम करणाऱ्या अभियंत्यांनी रस्त्याच्या कामाकडे लक्ष देणे अतिशय गरजेचे आहे. महानगरपालिका त्यासाठीच अभियंत्यांना वेतन देते. कोणत्याही ठेकेदाराच्या प्रभावाखाली येणे ही महानगरपालिकेशी केलेली प्रतारणा ठरेल.

त्या ठेकेदारांना करणार ब्लॅक लिस्ट
जळगाव महानगरपालिकेचे शहरात आता 168 ठिकाणी विविध प्रकारची कामे सुरू आहेत. जातील ७२ कामे ही पूर्णत्वास आली असून २२ कामे अजूनही सुरू करण्यात आलेली नाहीत. अशा काम सुरू न करणाऱ्या ठेकेदारांना ब्लॅक लिस्ट करण्यात यावेत असे आदेश यावेळी महापौर जयश्री महाजन यांनी दिलेत.

ठेकेदारांची दलाली करू नका

जळगाव शहरातील कोणताही ठेकेदार जर तुम्हाला त्रास देत असेल, किंवा तुमच्यावर कोणत्याही पद्धतीचा दबाव आणण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्या ठेकेदाराला घाबरू नका. कारण महापौर म्हणून मी तुमच्या मागे ठामपणे उभी आहे. तर दुसरीकडे तुम्ही मग ते दराची दलाली ही करू नका अशा शब्दात महापौर जयश्री महाजन यांनी संबंधित अभियंत्यांना ठणकावले