जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑक्टोबर २०२१ । येत्या काळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे जळगाव जिल्हा दौरा करू शकतात. याबाबत स्थानिक नेत्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. यामुळे लवकरच राज ठाकरे यांचा जिल्हा दौरा होईल असे म्हटले जात आहे.अमळनेर तालुक्यात लवकरच निवडणूका होणार आहेत. यावेळी या ठिकणी मनसेची ताकद चांगली आहे. म्हणून राज ठाकरे या ठिकाणी येऊ शकतात असे म्हटले जात आहे.
अमळनेर विधान सभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील आहेत. माजी आमदार शिरीष चौधरी यांची ‘स्वतंत्र मित्रपरिवार आघाडी’ टिकून आहे. भाजपच्या माजी आमदार स्मिता वाघ, माजी आमदार बी एस पाटील यांच्या समर्थक एकत्रित काम करून पक्षाचा वेगळा ठसा निर्माण करत आहेत. माजी आमदार रावसाहेब पाटील यांना मानणारा गट देखील अमळनेर मध्ये आहे. तर दुसरीकडे शिवसेना आणि काँग्रेस असे दोन्ही पक्ष आहेत.
अश्यावेळी अमळनेर मध्ये तिसरी आघाडी व्हावी अशी चर्चा आहे. तिसरी आघाडी जर बळकट करायची असेल तर अमळनेर मध्ये असलेली मनसेची सर्व शक्ती एकत्रित करून लढण्याची गरज आहे. यामुळे राज ठाकरे यांनी दौरा करावा यासाठी मनसेला एक गट प्रयत्नशील आहे. असे म्हटले जात आहे. तर ज्या वेळेस राज ठाकरे अमळनेर मध्ये येतील यावेळी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर इनकमिंग होईल असेही म्हटले जात आहे. यामुळे राज ठाकरे यांचा अमळनेर दौरा होईल कि नाही याकडे सर्वांचेच लक्ष आहे.