⁠ 
रविवार, मे 19, 2024

मुलीच्या वाढदिवसानिमित्त पोलीस अधिक्षकांनी राबवला आगळावेगळा उपक्रम

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जुलै २०२२ । पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांची कन्या देवयानी हीच्या वाढदिवसानिमित्त ‘अभय’ परिसरात वृक्षारोपण करून आगळावेगळा वाढदिवस साजरा केला. यात स्थानिक जैवविवधता जपणा-या देशी झाडांच्या रोपांची लागवड केली आहे.

जैन इरिगेशन सिस्टीम लि. च्या सहकार्यातुन गांधी रिसर्च फाऊंडेशन आणि मराठी प्रतिष्ठान यांच्यातर्फे हरित जळगाव ही संकल्पना घेऊन वृक्षारोपणाची चळवळ सुरू करण्यात आली आहे. पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी निवास परिसरात वृक्षलागवड करून कन्या देवयानीचा वाढदिवस साजरा करीत वृक्षलागवडीच्या चळवळीला प्रोत्साहन दिले. पोलीस अधिक्षक निवास परिसरात निंब, पिंपळ, करंज, गुलमोहर, बकूळ, जास्वंद, टिकोमा, पूत्रवंती, कन्हेर अशी 120 च्यावर झाडे लावली. सरासरी तीन वर्ष वयोगटाची ही रोपे होती.

वृक्षारोपणाप्रसंगी पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे, त्यांच्या पत्नी अमृता मुंढे या दाम्पत्यासह मुलगी देवयानी, दिग्विजय, सासरे सेवानिवृत्त आरटीओ आयुक्त लक्ष्मण खाडे, सासू मिराबाई खाडे यांच्यासह गांधी रिसर्च फाऊंडेशनचे समन्वयक उदय महाजन, हेमंत बेलसरे, जैन इरिगेशनच्या पर्यावरण विभागातील सहकारी अतिन त्यागी, अनिल जोशी, अजय काळे, मराठी प्रतिष्ठानचे ॲड जमील देशपांडे, सचिव विजयकुमार वाणी, राखीव पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे, राखीव पोलीस उपनिरीक्षक मंगल पवार, स.फौ. राजेश वाघ, पोलीस प्रशिक्षिक राजेश वाघ, विजय शिंदे, सोपान पाटील सर्व प्रशिक्षणार्थी अंमलदार उपस्थित होते. वृक्षारोपणासाठी जैन इरिगेशनच्या नर्सरी विभागातील, मंगलसिंग राठोड, रविंद्र सपकाळे, बबन गवळी, निलेश मिस्तरी यांनी सहकार्य केले.