⁠ 
सोमवार, मे 6, 2024

महावितरणचा मनमानी कारभार, सरपंच परिषदेतर्फे निवेदन

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जून २०२२ । एरंडोल तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठ्याचे तसेच स्ट्रीट लाईटचे बिल ग्रामपंचायतींना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता महावितरण कंपनीतर्फे कट करण्यात येत आहेत. त्यासाठी एरंडोल तालुका सरपंच परिषदेच्या वतीने महावितरणच्या उपअभियंता इंगळे व गटविकास अधिकारी डी.ए.जाधव यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात सध्या ग्रामपंचायतींकडे वसुली नसून अडचणीचा काळ असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे वॉटर सप्लाय चे व स्ट्रीट लाईट चे कनेक्शन पूर्वसूचना न देता कट करण्यात येऊ नये असे म्हटले आहे. यापुढे पूर्वसूचना न देता वीज कनेक्शन कट करण्यात येऊ नये तसेच यावर योग्य कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

याप्रसंगी सरपंच परिषदेचे तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील, भागवत पाटील उत्राण, स्वप्निल पाटील खडके खुर्द, उमेश पाटील वनकोठा, दिनेश आमले जवखेडेसिम, गुलाब पाटील जळू, निलेश पाटील दापोरी, सुभाष पाटील फरकांडे, सुनील भिल आडगाव, विकास सोनवणे खडकी सीम, विजयसिंह पाटील धारागीर, ईशवर पाटील मालखेडे, मनोहर पाटील भातखेडा, कैलास सोनवणे पिंपरी,कमलेश पाटील निपाने व सचिन पाटील ताडे उपस्थित होते.