जळगाव लाईव्ह न्युज | ७ मे २०२२ | जळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध असणाऱ्या मंगळग्रह मंदिरामध्ये आज महाराष्ट्र राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी दर्शन घेतले. यावेळी मी विरोधकांना सद्सद्विवेक बुद्धी मिळवी अशी प्रार्थना केल्या असल्याची टीका धनंजय मुंडे यांनी विरोधकांवर पत्रकारांशी बोलताना केली.
यावेळी मुंडे म्हणाले की, गेल्या दोन वर्षापासून कोरडा चा वाढता प्रादुर्भाव बघता जळगाव जिल्हा दौऱ्यावर आलो नव्हतो. यंदा ती संधी मला मिळाली. आज जळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी कार्यक्रमांसाठी मी आलो आहे. मंगळग्रह मंदिरांमध्ये राज्याची प्रगती होवो अशी प्रार्थना केली.