भडगावतून अल्पवयीन मुलाचे अपहरण

ऑगस्ट 2, 2022 12:28 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑगस्ट २०२२ । जिल्ह्यात हल्ली अल्पवयीन मुलांना अपहरण करण्याचे प्रमाण वाढले आहे. भडगाव तालुक्यातील पिचर्डे येथून एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलाला कुणी तरी अज्ञात व्यक्तीने अपहरण करून पळवून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत भडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime 2022 08 02T122813.843 jpg webp

जिजाबाई लहू भिल (वय ३५, रा.पिचर्डे ता.भडगाव) यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली. भिल यांचा भाचा देविदास भीमराम गायकवाड (वय १४) याला कुणी तरी अज्ञात व्यक्तनिने अज्ञात कारणासाठी अपहरण करून फूस लावून पळवून नेले. या प्रकरणी भिल यांनी पोलिसांत तक्रार दिली. पुढील तपास चंद्रसेन पालकर करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now