जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या 12वी ते ग्रॅज्यएट उमेदवारांसाठी एक उत्तम संधी चालून आलीय. पिंपरी चिंचवड महानगरपालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation) मध्ये विविध पदांसाठी मोठी भरती निघाली आहे. यासाठीची जाहिरात (PCMC Recruitment 2022) संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली असून इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ सप्टेंबर आहे.
एकूण पदसंख्या : ३८६
या पदांसाठी होणार भरती?
अतिरिक्त कायदा सल्लागार
विधी अधिकारी
उप मुख्य अग्निशमन अधिकारी
विभागीय अग्निशमन अधिकारी
उद्यान अधीक्षक (वृक्ष)
सहाय्यक उद्यान अधीक्षक
उद्यान निरीक्षक
हॉर्टीकल्चर सुपरवायझर
कोर्ट लिपिक
ॲनिमल किपर
समाजसेवक
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
लिपिक
आरोग्य निरीक्षक
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
कनिष्ठ अभियंता (विद्युत)
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार बारावी ते पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान चौदा वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
या पदभरती संदर्भातील सर्व माहिती सविस्तरपणे देणारं डिटेल नोटिफिकेशन हे लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
वयाची अट : ०८ सप्टेंबर २०२२ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
अर्ज शुल्क : १०००/- रुपये [मागासवर्गीय – ८००/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : ९,३००/- रुपये ते १,७७,५००/- रुपये.
अर्ज सुरू होण्याची तारीख – 19 ऑगस्ट 2022
भरतीची जाहिरात (Notification) वाचण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा